Ratnagiri News : रत्नागिरीच्या पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत (Swapnali Sawant) मागील 10 दिवसापासून बेपत्ता आहेत. या प्रकरणी संशयित म्हणून उपतालुकाप्रमुख असलेल्या त्यांच्या पतीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे समजते. स्वप्नाली सावंत यांचा मोबाईल पतीकडे मिळाल्याने संपूर्ण प्रकरणात पतीवरील संशय अधिक बळावला आहे. माहितीनुसार, काल दिवसभर पोलिसांकडून रत्नागिरी शहराच्या आसपासच्या परिसरात डॉग स्कॉडच्या मदतीने शोध घेण्यात आला होता. 1 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास कोणालाही न सांगता सावंत अचानक बेपत्ता झाल्या होत्या. मात्र आता या प्रकरणात पतीची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. स्वप्नाली सावंत अचानक बेपत्ता झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

लवकरच होणार उलगडा
रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सुकांत सावंत यांचे पती शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुकांत सावंत आहेत. माजी सभापती स्वप्नाली सावंत अचानक बेपत्ता झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांचा शोध सुरू असतानाच आता पोलिसांनी त्यांचे पती सुकांत सावंत यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे. या प्रकरणी लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे.

मागील 10 दिवसांपासून बेपत्ता
स्वप्नाली सावंत या मागील 10 दिवसांपासून बेपत्ता आहेत. याप्रकरणी पती सुकांत सावंत यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. याबाबत सुकांत सावंत यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी स्वप्नाली सावंत यांचा शोध सुरू केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आगामी सण-उत्सव देखील निर्बंधमुक्त आणि जल्लोषात साजरे व्हावेत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Dhule : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, धुळ्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू

from maharashtra https://ift.tt/jfzmSCD
Ratnagiri : रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती 10 दिवसांपासून बेपत्ता, पतीवरील संशय बळावला, चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात
September 09, 2022
0
Tags