Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. गेली काही दिवस पावसानं उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह ठाणे परिसारत चांगली पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर लातूर, बीड, नाशिक, परभणीसह हिंगोली जिल्ह्यातही पाऊस पडला आहे. लांबलेल्या पावसामुळं खरीप पिके धोक्यात आली होती, मात्र, पावसामुळं पिकांनी जीवदान मिळालं आहे. दरम्यान, आजही पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारपासून (8 ऑगस्ट) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?

यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.

लातूर शहरासह परिसरात चांगला पाऊस

लातूर शहर आणि परिसरात तुफान पाऊस झाला आहे. शहरालगतच्या शेतामध्ये पाणीच पाणी साचले आहे. अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर लातूरमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. या पावसामुळं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

परळीत जोरदार पाऊस, पिकांना जीवनदान

परळीत झालेल्या मुसळधार पावसामुळं सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. एक तास विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसानं पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तीन आठवड्यापासून पाऊस गायब झाल्यानं शेताततल्या उभी पिक माना टाकू लागली होती. मात्र, काल झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे.

मराठवाडा पाऊस

गेल्या 15 दिवसांपेक्षा अधिकच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवारपासून पावसाचा जोर अधिक वाढतांना पाहायला मिळाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत अधिकचा पाऊस झाला आहे. 1 ते 4 सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यात 16.6 मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत 21.5 मिमी पाऊस पडला आहे. या चार दिवसात झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाला आहे.

from maharashtra https://ift.tt/WCJwGZn
Maharashtra Rain : आज पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट
September 05, 2022
0
Tags