<p>Maharashtra Rain : परतीच्या पावसाचा मराठवाड्याला मोठा फटका बसलाय. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस बरसतोय. या पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान झालय. विदर्भातही धुळे, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसानं झोडपलंय.... तिकडे पश्चिम महाराष्ट्रातही परतीच्या पावसानं जाता जाता मोठा धक्का दिलाय. ऐन नवरात्रीत या पावसाचा झेंडू च्या शेतीला मोठा फटका बसलाय... शेतात पाणी साठल्यानं झेंडूची रोपं आडवी जाली आहेत आणि काढणीच्या फुलांचं मोठं नुकसान झालंय.. सोयाबीन आणि कापूस पिकालाही या पावसाचा फटका बसलाय. परभणी जिल्ह्यालाही सलग तीन दिवस पावसानं झोडपलंय... त्यामुळे येलदरी आणि लोअर दुधना प्रकल्पातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आलाय. </p>
from maharashtra https://ift.tt/L2V6xJN
Maharashtra Rain : परतीच्या पावसाचा मराठवाड्याला मोठा फटका, हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये फटका
September 28, 2022
0
Tags