<p>केंद्र सरकारने निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ते भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम करतील. पहिले सीडीएस बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर हे पद रिक्त होतं. अनिल चौहान यांनी सुमारे 40 वर्षांच्या त्यांच्या लष्करी कारकिर्दीत अनेक कमांड, स्टाफ आणि इंस्ट्रूमेंटल पदांवर काम केलं होतं. जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्य भारतात बंडविरोधी कारवायांना प्रत्युत्तर देण्याचा त्यांना अनुभव आहे. </p>
from maharashtra https://ift.tt/buC289E
Anil Chauhan New CDS : अनिल चौहान भारताचे नवे सीडीएस, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
September 28, 2022
0
Tags