Maharashtra Rain : राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पडत आहे. मुंबईसह, ठाणे परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे. तसेच पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं हजेर लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 16 आणि 17 सप्टेंबर म्हणजे आज आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकणातील काही भाग आणि घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या भागात देखील हवामान विभागानं पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रीय राहील, अशी माहिती हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र सिंधुदुर्गात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी, गणेश विसर्जनानंतर पावसाचा जोर वाढला

नाशिक (Nashik) शहर परिसरासह जिल्ह्यातील काही भागात अधून मधून संततधार (Rain) सुरूच आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसानं हजेरी लावली आहे. गंगापूर धरणांतून (Gangapur Dam) 5 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळं गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून, नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यात ऊन ढगाळ वातावरण पाऊस अशी स्थिती पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर व गंगापूर (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळं पुन्हा एकदा नदी नाल्याना काही प्रमाणात पूर आला आहे. नाशिकमध्ये गणेश विसर्जनानंतर (Ganesh Immersion) पावसाचा जोर वाढला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/C8mNFYV News : अतिवृष्टीमुळं तळकोकणात 183 हेक्टरवरील भात शेतीचं नुकसान, जिल्हा प्रशासनाचा राज्य सरकारला अहवाल

<a href="https://ift.tt/wc3x6n4 News : 15 दिवसानंतर नंदूरबारमध्ये पावसाची हजेरी, पिकांना फायदा, अंतर मशागतीच्या कामांना वेग

from maharashtra https://ift.tt/6dPmEDN
Maharashtra Rain : मुंबईसह पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, आजही राज्यात पावसाचा अंदाज
September 15, 2022
0
Tags