ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) जामीन याचिकेवर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी

संजय राऊतांच्या जामीन याचिकेवर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. संजय राऊतांच्या याचिकेवर ईडी आपलं उत्तर सादर करणार आहे

महाराष्ट्रात आज चांगल्या पावसाचा अंदाज (Maharashtra Rain Update)

कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकले असले तरी महाराष्ट्रात पुढील आज चांगल्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे मुंबईसोबतच उपनगरात जोरदार पावसाची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री रेणुकाजी सिंह शिरूर लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर

केंद्रीय मंत्री रेणुका सिंह या शिरूर लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार आहेत. 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान संघटनात्मक व सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez)  ईडी (ED) कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या अनेक दिवसांपासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता दिल्ली पोलिसांकडून जॅकलीनला मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आला आहे. 14 सप्टेंबरला जॅकलीन सकाळी 11 वाजता चौकशीला उपस्थित राहणार आहे

हर्षा इंजिनिअर या कंपनीचा आज आयपीओ (IPO) येणार

बेअरिंग केज बनवणाऱ्या हर्षा इंजिनिअर या कंपनीचा आयपीओ येणार आहे. कंपनी आयपीओच्या (IPO) माध्यमातून शेअर बाजारात लिस्ट होणार असून या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 755 कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीने 314 ते 330 रुपयांच्या दरम्यान प्राइस बँड निश्चित केला आहे.

आज हिंदी दिवस

हिंदी भाषेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी हिंदी भाषा भारताच्या अधिकृत भाषांपैकी एक म्हणून घोषित करण्यात आली.

from maharashtra https://ift.tt/NdGP9Hv
Maharashtra Breaking News 14 September 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
September 13, 2022
0
Tags