Mumbai University : राज्यपालांच्या (Governor) सुचनेमुळे सुरु झालेला मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाच्या नावाचा वाद आता पुन्हा राज्यपालांच्या कोर्टात गेला आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (Vice-Chancellor) सुहास पेडणेकर यांनी काल विद्यार्थी संघटना प्रतिनिधींशी बोलताना या वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचं नाव देण्याची विद्यार्थ्यांची मागणी आणि त्यांच्या तीव्र भावना राज्यपालांपर्यंत लेखी पोचवण्याचं आश्वासन दिले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला सावरकरांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र या निर्णयाला विरोध दर्शवत तीव्र आंदोलन करायला सुरुवात केली. त्यामुळे या विद्यार्थी संघटनांचे म्हणणे समजून घेऊन त्यांच्या भावना राज्यपालांकडे लेखी स्वरुपात कुलगुरू मांडणार असल्याचं कालच्या बैठकीत सांगण्यात आलं

वसतिगृहाला सावरकरांच्या नावाला विरोध करणाऱ्या संघटनांसोबत कुलगुरूंनी घेतली बैठक

मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव द्या, अशी राज्यपालांनी सूचना केली होती. राज्यपालांचे सूचनेला राष्ट्रवादी युवक काँग्रेस छात्रभारती आणि AISF यांनी विरोध करत राजश्री शाहू महाराजांचं नाव आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वस्तीगृहाला देण्यात यावं, अशी पत्रद्वारे मागणी राज्यपाल आणि मुंबई विद्यापीठ कुलगुरुंकडे केली. मुंबई विद्यापीठात कोल्हापूर मध्ये सुद्धा आंदोलन करून सावरकराच्या नावाचा विरोध आणि शाहू महाराजांच्या नावाची मागणी केली होती

संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढावा,
या बैठकीत कुलगुरूंनी विद्यार्थी संघटनांचं म्हणणं ऐकून घेतलं. या बैठकीत सर्वच विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, राज्यपाल, कुलगुरू आणि विद्यार्थी संघटना अशी संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी राज्यपाल यांच्याकडे लेखी स्वरूपात पोहचवावे अशी विनंती केली. ही मागणी मान्य करत कुलगुरू यांनी राज्यपालांना पत्रव्यवहार करण्याचे मान्य केले.

from maharashtra https://ift.tt/kqGR5Sj
Mumbai University : मुंबई विद्यापीठ वसतिगृहाच्या नामांतराचा वाद; कुलगुरू राज्यपालांकडे विद्यार्थी संघटनांच्या भावना कळवणार
August 01, 2022
0
Tags