Ads Area

Maharashtra Breaking News 3 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू....

तैवानच्या मुद्यावरून जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?

चीनच्या बॉंबस्फोटाच्या धमकीनंतरही नॅन्सी पेलोसी या तैवानमध्ये गेल्या असून उद्या त्या राष्ट्रपतींना भेटणार आहेत. नॅन्सी पेलोसींच्या या दौऱ्यामुळे चीन दावा करत असलेल्या एका लोकशाही देशामागे जगातली सर्वात जुनी लोकशाही उभी असल्याचा संदेश अमेरिकेने दिला आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर महत्वाची सुनावणी

राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघाला कलाटणी देणारी महत्वाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होणार आहे.   या प्रकरणी 20 जुलैला सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत 1 ऑगस्टला पुढची सुनावणी ठरली होती.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर अपात्रेच्या कारवाईच्या मागणीवरुन, मुख्य शिवसेनेकडून करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर यावेळी सुनावणीची शक्यता आहे. सरन्यायाधीश रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या पीठापुढे सुनावणी होणार आहे.

विरोधी पक्षनेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

विदर्भ आणि मराठवाडात आलेल्या पूराची अजित पवार यांनी 29 जुलै ते 31 दरम्यान पाहणी केली.  अजूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. मृतांच्या कुटुंबियांना सुद्धा पुरेशी मदत मिळाली नाही. ही मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत.

ऑनलाईन अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार

ऑनलाइन अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना मिळाल्या कॉलेजमध्ये 6 ऑगस्टपर्यंत आपली प्रवेश निश्चित करायचे आहेत

राहुल गांधी कर्नाटक दौऱ्यावर

काँग्रेस नेते राहुल गांधी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी कर्नाटकाती दोन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

from maharashtra https://ift.tt/PLUhtr8

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area