राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत...

Maharashtra Cabinet Expansion : कोणी एकदा, तर कोणी तीनदा पक्ष बदलला! शिंदे-फडणवीस सरकारमधील 6 मंत्र्यांची फिरती राजकीय निष्ठा न्यारीच!

Maharashtra Cabinet Expansion : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यापासून फक्त 2 जणांवर कारभार चाललेल्या राज्यातील शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. त्यामुळे तब्बल 40 दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्याला किमान 20 जणांचे मंत्रिमंडळ मिळाले आहे.

आज राजभवनात शपथविधी पार पडला. यामध्ये भाजपकडून पहिली शपथ काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा या क्रमाने 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

18 पैकी 6 मंत्र्यांच्या या पक्षातून त्या पक्षात उड्या
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून राळ उडवून दिली तेच भाजपमध्ये नेते सामील झाले आहेत. त्यामुळे या नेत्यांच्या चौकशीचे पुढे भाजपमध्ये जाऊन काय होते? याचे उत्तर कधीच मिळत नाही. केंद्रीय तपास यंत्रणांनी सुद्धा भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांची चौकशी सुरुच ठेवली का? याचेही कधीच प्रामाणिक उत्तर दिलेलं नाही.

राधाकृष्ण विखे पाटील यांचा काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस ते भाजप असा प्रवास
विखे पाटील घराण्याला मोठा सहकार आणि राजकीय वारसा आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज त्यांना पहिल्यांदा शपथ देण्यात आली. त्यांचा काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस ते भाजप असा त्यांचा प्रवास राहिला आहे. जवळपास सहा मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांनी काम केलं आहे. त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून सक्षम जबाबदारी पार पाडण्याऐवजी 2014 मध्ये भाजपत प्रवेश केला होता.

मनोधैर्य योजनेकडे शासनाचं दुर्लक्ष, मदत निधी मिळवणाऱ्या पीडित महिलांची संख्या कमी, चित्रा वाघ यांचे आरोप

बलात्कार पीडित महिला तसेच लैंगिक छळाच्या प्रकरणातील अल्पवयीन मुलींना त्यांच्यासोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा जीवनात उभारी घेता यावी, या उद्दिष्टाने महाराष्ट्र सरकार गेले अनेक वर्षांपासून मनोधैर्य योजना राबवीत आहे. मात्र गेल्या काही वर्षात मनोधैर्य योजनेकडे सरकारचा दुर्लक्ष होत आहे का अशी शंका निर्माण झाल्याचे सांगत भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी यासंदर्भात आघाडी सरकारवर आरोप केले आहे. काय म्हणाल्या चित्रा वाघ?

शासन पातळीवर निधी मिळत नव्हते
एका बाजूला बलात्कार तसेच लैंगिक छळाच्या घटना वाढत असताना वर्षागणिक मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून मदत निधी मिळवणाऱ्या पीडित महिलांची आणि मुलींची संख्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या काही वर्षात मनोधैर्य योजनेमध्ये मदत मिळवून नव्याने जीवन सुरू करणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेतली तर सातत्याने निधी मिळवणाऱ्या पीडितांची संख्या खाली घसरत असल्याचे दिसून येते. वर्ष 2014-15 मध्ये मनोधैर्य योजनेत निधी मिळवणाऱ्या महिलांची संख्या 2 हजार 502 होती. ती वर्ष 2019-20 पर्यंत 462 पर्यंत खाली आली आहे. असं सांगत चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

from maharashtra https://ift.tt/pu6ga8v
Maharashtra Breaking News 10 August 2022 : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
August 09, 2022
0
Tags