Kharip Pik Vima: नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रत्येक वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे भारतातील लाखो शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. जसे की महापूर, चक्री, वादळे, गारपीट आणि अतिवृष्टी अशा इत्यादी प्रकारच्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे खूप नुकसान होते. अशा संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू केली आहे. ही योजना 13 जानेवारी 2016 रोजी अमलात आणली आहे.
संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मागील वर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे बरेच नुकसान झाले होते. त्या नुकसानीपोटी आता सरकारने एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढला आहे. या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन 2021 साठी पिक विमा हप्ता अनुदानापोटी राज्यशासन हिश्याची 28 कोटी 83 लाख 16 हजार 428 रुपये एवढा निधी विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे.Kharip Pik Vima
संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय कृषी विमा विमा कंपनीने सादर केलेली मागणी, कृषी आयुक्तालय याची शिफारस आणि केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना मधील मुद्दा 13.1.11 या बाबीचा विचार करता प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 अंतर्गत पिक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरित राज्य शासन हिस्सा अनुदानाच्या हप्त्यापोटी रुपये 28 कोटी 83 लाख 16 हजार 428 रुपये निधी कंपन्यांना अदा करण्यासाठी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. ही रक्कम खरीप हंगाम 2021 परिता वितरित करण्यात येत आहे.Kharip Pik Vima
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे
प्रधानमंत्री पिक विमा ही सर्व शेतकरी बांधवांसाठी ऐच्छिक योजना आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांच्या विमा संरक्षित रकमेचे दोन टक्के रक्कम भरावी लागणार आहे. नैसर्गिक आपत्ती, किडा आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. खरिपातील सर्व पिकांसाठी जोखीम स्तर 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे.Kharip Pik Vima
संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा