Ads Area

Eknath Shinde : अयोध्या हा आमच्या श्रद्धेचा विषय, मुख्यमंत्री म्हणून लवकरच अयोध्येला जाणार- एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री म्हणून लवकरच अयोध्येला जाणार आहे. तसेच आमच्या अनेक आमदारांना जायचं आहे. अयोध्या हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. कुणालाही आता हिंदू देवदेवतांबाबत काहीही वाकडे-तिकडे बोलता येणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते काल ठाण्यात बोलत होते. सत्कार झाल्यानंतर ठाण्यात त्यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

भाजप-शिवसेना युतीमध्ये लढणार - एकनाथ शिंदे

येणाऱ्या सर्व महापालिका निवडणुका भाजप-शिवसेना युतीमध्ये लढणार असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केले आहे. महाराष्ट्रात नवीन ED आली आहे. मात्र जे चुकीचे काम करतात, त्यांना घाबरायला हवे, जे नाही करत, त्यांनी का घाबरावं?

उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस नाराज होते? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले..
उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस थोडे नाराज होते, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे केले आहे. सरकार कसे बनवले त्यापासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का? या प्रश्नांची उत्तरे एकनाथ शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदासाठी माझं नाव घेतलं. ते त्यांना आणि मला माहित होतं. ते खूश होते, पण त्यांच्या वरिष्ठांनी सांगितले की उपमुख्यमंत्री पद घ्या. त्यावेळी ते थोडे नाराज दिसत होते, मी म्हणालो त्यांना तर ते म्हणाले की पक्षाने मला सर्व काही दिले, त्यांचे आदेश मला मान्य आहेत. मी त्यांना म्हणायचो किती काम करता तुम्ही, तर ते म्हणायचे कितीही काम केले तरी तुमच्या इतके काम मी करू शकत नाही.

बाळासाहेबांचा आदेश मानणारे आम्ही होतो म्हणून आम्ही ते सहन केले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,"आम्ही युतीत असताना निवडणूक लढवली, बाळासाहेब, मोदी यांचा फोटो लावून निवडणूक लढवली त्यानंतर महाविकस आघाडी झाली आणि बाळासाहेबांचा आदेश मानणारे आम्ही होतो म्हणून आम्ही ते सहन केले. नंतर खच्चीकरण सुरू झाले. आम्ही सगळं पाहत होतो. मी उद्धव ठाकरे यांना समजावून सांगितले, आमदारांची भावना सांगितली"खूप लोक संपर्कात आहेत. देवेंद्रजी आणि माझ्यापण पण आम्हाला त्यांची गरज नाही. विधानपरिषदेत पहिल्या दिवशी 107 मते होती, दुसऱ्या दिवशी ती 99 झाली, ही कलाकार मंडळी आहेत.  राज्यसभेत जितकी मते आम्हाला हवी होती तितकी मिळाली नाही, एक माणूस पराभूत झाला, पण चुकीचा माणूस पराभूत झाला. आम्ही जी भूमिका घेतली ती अडीच वर्ष आधी घ्यायला हवी होती, तेव्हा चुकीचे काम झाले ते आम्ही दुरुस्त केले.

संबंधित बातम्या

उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस नाराज होते का? मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदाच बोलले

from maharashtra https://ift.tt/y2svGBo

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area