Flag hoisting by CM Eknath Shinde : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त (Independence Day 2022) ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. याचंच औचित्य साधून मध्यरात्री बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाण्याच्या (Thane) शिवसेना (Shiv Sena) शाखेत ध्वजारोहण (Flag hoisting) केलं. आनंद दिघे (Anand Dighe) जिल्हाध्यक्ष असताना मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची चाळीस वर्षापुर्वीची परंपरा मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवली असल्याचं हे दिसून आलं आहे. पण महत्वाचं म्हणजे, या कार्यक्रमात शिंदे गट विरुद्ध उद्धव गट असा सामना देखील रंगणार होता. कारण ठाकरे गटात असलेले राजन विचारे यांना पोलिसांची नोटीस देऊनसुद्धा ते या कार्यक्रमात हजर होते. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु सुदैवानं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री 12 वाजता ठाण्याच्या शिवसेना शाखेत ध्वजारोहण केलं. यावेळी शेकडो नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. आनंद दिघे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची परंपरा सुरू केली होती, तिच परंपरा आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर देखील कायम ठेवली आहे. या कार्यक्रमावेळी शिंदे गट विरुद्ध उद्धव गट असा सामना देखील रंगणार होता. कारण उद्धव ठाकरे गटात असलेल्या राजन विचारे यांनी पोलिसांनी नोटीस देऊन देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते देखील आमने-सामने आल्यानं काही वेळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. मात्र सुदैवानं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही.

ध्वजारोहण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "अमृत महोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत आहे. देशभक्तीची लाट नागरिकांमध्ये उत्पन्न झाली आहे. सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. ज्ञात अज्ञात सेनानींनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं, त्यांना अभिवादन करतो. आनंद दिघे यांनी ही ठाण्यात परंपरा सुरू केली त्याचा आनंद होतोय, राज्यातही घराघरावर तिरंगा कार्यक्रम आयोजित करण्यात आला."

मंत्रिमंडळातील खातेवाटबाबातही त्यांनी यावेळी भाष्य केलं. ते म्हणाले की, "ज्या विभागाची जबाबदारी, ज्या मंत्र्यांवर दिलेली आहे, ती यशस्वीपण पार पाडतील, आता ते राज्याचे मंत्री आहेत." तसेच, ध्वजारोहणासाठी उद्धव गटात असलेली राजन विचारेही उपस्थित होते. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "पोलिसांना सूचना देण्यात आल्या होत्या. ज्यांना या ध्वजारोहण समारंभासाठी उपस्थित राहायचं आहे, त्यांना येऊ द्या, असं सांगितलं होतं."

"धक्कादायक ,वेदनायदायक दुर्घटना घडली आहे. आरक्षणासाठी आंदोलन केलं. शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या जाण्यानं मराठा समाजाचं नुकसान झालं आहे. त्यांचं अपूर्ण राहिलेलं काम आम्ही पूर्ण करू", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

from maharashtra https://ift.tt/PNneCaw
मुख्यमंत्र्यांकडून ठाण्यात मध्यरात्री ध्वजारोहण; शेकडो ठाणेकर उपस्थित, तर कार्यक्रमात शिंदे-राजन विचारे आमने-सामने
August 14, 2022
0
Tags