Ads Area

दुर्दैवी! रक्षाबंधनासाठी बहिणीकडे जाणाऱ्या भावावर काळाचा घाला; होत्याचं नव्हतं झालं...

Sangli News Updates: सांगली जिल्ह्यात (Sangli Latest News) रक्षाबंधनासाठी (Raksha Bandhan) बहिणीकडे जाणाऱ्या भावावर काळाने घाला घातल्याची घटना घडली आहे. बहिणीकडे रक्षाबंधनासाठी जात असताना झालेल्या अपघातात भावाचा मृत्यू झाला आहे. खानापूर तालुक्यातील (Khanapur Taluka) भिवघाट ते पळशी रस्त्यावर हिवरे गावाच्या हद्दीत हा अपघात घडला आहे. दुचाकी आणि  ट्रकच्या अपघातात नवनाथ जनार्दन पाटील (वय६०,रा. पळशी ता. खानापूर) यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जनार्दन हे आज सकाळी रक्षाबंधनासाठी आपल्या बहिणीकडे विट्याला येत होते. सकाळी साडे आठच्या सुमारास विजापूर ते गुहागर राष्ट्रीय महामार्गावरून कराडच्या दिशेने  कर्नाटक पासिंग असलेला एक ट्रक निघाला होता. रस्ता विचारण्यासाठी भिवघाट परिसरातील एका पेट्रोल पंपासमोर ट्रॅक चालकाने ट्रक थांबवला होता. त्याच वेळी पळशीकडून विट्याकडे नवनाथ जनार्दन पाटील हे आपल्या दुचाकी (एम एच 10 डी सी 2915)  वरून भरधाव वेगाने निघाले होते.

वाटेत या पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या ट्रकला नवनाथ पाटील यांच्या दुचाकीने पाठीमागून जोराची धडक दिली. यात नवनाथ पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना त्यांचे बंधू राजाराम पाटील यांनी तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल केले. मात्र तत्पूर्वी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत पाहणी केली.

पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, नवनाथ पाटील हे सकाळी लवकर रक्षाबंधनसाठी विट्याला बहिणीकडे येत असल्याची माहिती विटा पोलिसांनी दिली. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

from maharashtra https://ift.tt/Ak4yuNp

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area