VJNT Loan scheme: वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळात तर्फे आतापर्यंत 25 हजारांपर्यंत नागरिकांना बिनव्याजी कर्ज मिळत होते. परंतु आत्ताच आलेल्या शासन निर्णयानुसार आता या नागरिकांना 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. या योजनेचा नवीन शासन निर्णय हा 14 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात आलेला आहे.
येथे पहा या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि शासन निर्णय
या शासन निर्णयानुसार आपण पाहणार आहोत की या योजनेचा लाभ कोणते नागरिक घेऊ शकतात. पात्रता काय आहे कोण कोणत्या अटी आहेत. अर्ज कोठे करावा लागतो तशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये आज पाहणार आहोत यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.
मित्रांनो, सुरुवातीला आपण VJNT Loan scheme या योजनेचा लाभ कोण कोणता नागरिक घेऊ शकतो हे पाहू या,
या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी-
1) अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
2) अर्जदाराचे वय हे 18 ते 50 वर्ष असावे.
3) अर्जदाराने यापूर्वी इतर महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
4) अर्जदार हा कोणत्याही बँकेचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
5) अर्जदाराच्या कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार.
6) अर्जदाराचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे.
महत्वाची बातमीघर बांधायचे असेल तर घर बांधण्यासाठी 50 लाख रुपये मिळणार तेही 100% मिळणार
VJNT Loan scheme या योजनेकरिता अर्ज करण्यासाठी फोन कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत?
a) राशन कार्ड
b) आधार कार्ड
c) जातीचे प्रमाणपत्र
d) पासपोर्ट साईज फोटो(एक)
e) बँक पासबुक
f) पॅन कार्ड पॅन
g)प्रोजेक्ट रिपोर्ट
येथे पहा या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि शासन निर्णय