Neelam Gorhe : सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) सुरु असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य या निर्णयावर अवलंबून असताना विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी एक चांगला ऐतिहासिक निर्णय लवकरात लवकर येईल असे भाकीत व्यक्त केले आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असली तरी ती ऐकत असते, समजून घेत असते आणि मग निर्णय देत असते. ज्यावेळी अनेक राजकीय अथवा सामाजिक विषयांवर मोठी कोंडी होते आणि न्यायालयाच्या निर्णयाकडे जनता अपेक्षेने पाहत असते, अशा वेळी न्यायालयाकडून अतिशय चांगले आणि दिशादर्शक निर्णय मिळालेले आहेत. विशेषतः घटनात्मकरित्या ज्या तरतुदी आहेत, अशावेळी न्यायालये अंमलबजावणी करून अत्यंत काटेकोरपणे आणि चांगल्या रीतीने निर्णय देते असा देशाचा अनुभव आहे . त्यामुळे महाराष्ट्रातील या राजकीय कोंडीबाबत देखील न्यायालयाकडून चांगला ऐतिहासिक निर्णय येईल असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले .

जनताच यांना उत्तर देईल
राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे अधिकार सर्वतोपरी सरकारचे असले तरी सध्या राज्यात ज्या पद्धतीने पूरस्थिती आहे, रोगराई पसरू लागलीय, अशावेळी प्रशासनाला आदेश देऊन त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम मंत्र्यांचे असते. पण अजूनही विस्तार होत नसला तरी विरोधी पक्षनेते अजित पवार, आणि आदित्य ठाकरे हे सध्या राज्यभर दौरे करीत असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. हा सर्व प्रकार जनता उघड्या डोळ्याने पाहत असून जनताच याना उत्तर देईल असे सांगितले.

यामागे फार मोठी राजकीय शक्ती
शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर ज्या पद्धतीने केंद्रीय तपस यंत्रणेच्या त्रासाने शिंदे गटात गेले ते पाहता एक दिवस या दडपशाही विरोधात भारतीय जनता उभा राहील असे भाकीत नीलम गोऱ्हे यांनी केले. सध्या देश वेगळ्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीतून जात असताना वेगवेगळ्या पद्धतीने कोंडी करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. हे फक्त राजकीय नेत्यांच्याच बाबतीत होत नसून वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही घुसमट सामाजिक माध्यमावर बघायला मिळत असून गौरी लंकेश, गोविद पानसरे, नरेंद्र दाभोलकर यांच्या मृत्यू नंतरही त्यांना ट्रॉल करायचे काम सुरु आहे. हे सर्व कोणाच्या पाठिंब्यावर सुरु आहे? असा सवाल करून यामागे फार मोठी राजकीय शक्ती असल्याचे सांगत गोऱ्हे यांनी भाजपाला लक्ष केले . सध्या समाजाच्या विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर शिवसेनेसोबत जोडली जाऊ लागली आहेत. समाजामध्ये जेवढी जागृती झपाट्याने होईल तसा सर्व समाज या दडपशाही विरोधात उभा राहील असा विश्वास नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला .

from maharashtra https://ift.tt/XJt7rR3
Maharashtra Politics : घटनात्मक कोंडीच्या प्रसंगी सर्वोच्च न्यायालय ऐतिहासिक निर्णय देईल, नीलम गोऱ्हेंचा विश्वास
July 30, 2022
0
Tags