Ads Area

Maharashtra Mumbai Rains LIVE : मराठवाड्यासह विदर्भ आणि कोकणात जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम

Maharashtra Rain Updates LIVE : राज्याच्या अनेक भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूर आल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच शेतीला देखील मोठा फटका बसला आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यात गंबीर स्थिती आहे. तसेच मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली या भागात देखील पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस पडत असल्याचं चित्र दिसत आहे.

आंबोली घाटात झाड कोसळलं

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात झाड कोसळल्याची घटना घडली. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या तिथे एकेरी वाहतूक सुरु आहे. दरम्या, झाड बाजूला करण्याचे प्रयत्न सरु आहेत.

अमरावती जिल्ह्यातही जोरदार पाऊस

अमरावती जिल्ह्याला वरदान असलेल्या अप्पर वर्धा धरणाची 13 गेट उघडण्यात आली आहेत. तेरापैकी 9 गेट 70 सेंटिमीटरने तर चार गेट 60 सेंटिमीटरने उघडण्यात आली आहेत. त्यामधून 1 हजार 392 दश लक्ष घन मीटर क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

चंद्रपूर शहरात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता

चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. वर्धा, अमरावती, भंडारा जिल्ह्यातून आणि चंद्रपूरच्या इरई धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.  शहराला वळसा घालणाऱ्या इरई नदीचे बॅक वॉटर सखल भागात शिरण्याची शक्यता आहे.

from maharashtra https://ift.tt/peuTXkd

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area