Coronavirus in Maharashtra : देशभरात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वेगानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातल्यात्यात दिलासादायक बाबा म्हणजे, कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रात (Maharashtra) ओमायक्रॉनचा (Omicron) सबव्हेरियंट बीए.5 (Sub Variant BA.5) ची लागण झाल्याले रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं माहिती दिली आहे की, दोन रुग्णांना ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट बीए.5 ची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. दोन रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुण्यात पाठवण्यात आले होते. असं सांगितलं जात आहे की, दोन्ही रुग्ण महाराष्ट्राच्या बाहेरील आहेत. सध्या व्यावसायिक कारणास्तव पुण्याच्या ग्रामीण भागांत वास्तव्यास आहेत.

दुबईहून आलेत दोन्ही रुग्ण

आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, दुबईहून परतल्यानंतर पुणे विमानतळावर नियमित तपासणी दरम्यान या दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं होतं. आरोग्य विभागानं पुढे बोलताना म्हटलं की, सध्या, दोन्ही बाधित रुग्णांमध्ये, कोणत्याही प्रकारची लक्षणं दिसून आलेली नाहीत. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर ते कोरोनामुक्त झाले आहेत.

ओमायक्रॉनच्या सब-व्हेरियंट्समध्ये वाढ

महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 सब-व्हेरियंट्सच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत Omicron च्या BA.4 आणि BA.5 सब-व्हेरियंट्सच्या रुग्णांची संख्या 160 वर पोहोचली आहे. त्यात पुण्यातील 93, मुंबईतील 51, ठाण्यात 5, नागपूरमधील 4, पालघरमधील 4 आणि रायगडमधील 3 जणांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात शुक्रवारी 2,515 नव्या रुग्णांची नोंद

शुक्रवारी राज्यात 2515 नव्या रुग्णांची (Corona Update) भर पडली आहे तर 2449 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काल (शुक्रवारी) एकूण सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 78,67,280 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.97 टक्के इतकं झालं आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्क्यांवर पोहोचला आहे.

from maharashtra https://ift.tt/N3XvO2E
Coronavirus : चिंता वाढली! महाराष्ट्रात आढळला ओमायक्रॉन BA.5 सब-व्हेरियंट; पुण्यात 2 रुग्णांची नोंद
July 22, 2022
0
Tags