Ads Area

आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर, दौऱ्यात कोणते मोठे निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष

<a href="https://ift.tt/1Z79yAe Shinde Maharashtra Tour : आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दौरा करणार आहेत. आज (29 जुलै) सायंकाळी 4 वाजता मुख्यमंत्री मुंबई येथील शासकीय निवासस्थानाहून नाशिक मार्गे मालेगावकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचं मालेगाव शासकीय विश्रामगृहावर आगमन होईल. रात्री येथेच त्यांच्या मुक्काम असेल. 30 जुलै रोजी सकाळी 10 वाजेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्यास सुरुवात करतील.

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच 30 जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. 30 जुलै आणि 31 जुलै रोजी मुख्यमंत्री मालेगाव तसेच संभाजीनगरचा दौरा करतील. दरम्यान या दौऱ्याला राजकीय पार्श्वभूमी असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री नाशिक ऐवजी थेट मालेगाव तालुक्याचा नियोजित दौरा करणार असं समोर येत आहे. शिवसेनेचे दादा भुसे आणि सुहास कांदे हे निष्ठावंत शिवसैनिक शिंदे गटात सामील झाल्यानंतर नाशिकमध्ये शिवसेना दुबळी झाल्याचे चित्र आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी आधी संजय राऊत त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी दौरा केला. आदित्य ठाकरे यांनी तर तिन्ही बंडखोरांवर चांगलीच आगपाखड केली. त्यामुळे दादा भुसे आणि सुहास कांदे यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट मालेगावात येणार आहेत. दरम्यान या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे भूमिपूजन, उदघाटन आणि विशेष जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं आहे.

मालेगावचा उल्लेख जि.(जिल्हा) मालेगाव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मालेगावचा उल्लेख जि.(जिल्हा) मालेगाव असा करण्यात आलाय. मुख्यमंत्री यांच्यां पहिल्याच मालेगाव दौऱ्यात मालेगाव जिल्हा करण्यासंदर्भात प्रस्तवावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांचा दौरा कार्यक्रम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 29 जुलै रोजी मुंबईतील शासकीय निवासस्थान येथून गाडीने ठाणे शहापूर इगतपूरी (घोटी)- नाशिक मार्गे मालेगावकडे मार्गस्थ होतील. मालेगाव शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे रात्री दहाच्या सुमारास आगमन होईल. मालेगावी ते मुक्काम करतील.

यानंतर शनिवार (दि. 30) रोजी सकाळी 10 वाजता ते पाऊस, अतिवृष्टी पिक- पाणी आणि विकास कामे विभागीय आढावा घेणार आहेत. सकाळी अकराच्या सुमारास मालेगाव शहरातील क्रिडा संकुलात नाशिक ग्रामीण घटकातील नविन शासकीय निवासस्थान प्रकल्प प्रशासकीय इमारतीचे मालेगाव लोकार्पण ते करणार आहेत.

यानंतर बोरी-आंबेदरी आणि दहिकुटे कालवा भूमिपूजन, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत काष्टी, ता. मालेगांव जि. नाशिक येथे कृषी विज्ञान संकुलचे भूमिपूजन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान रस्ते विकास प्रकल्पाचे भूमिपूजन, जल जिवन मिशन-दाभाडी 12 गांव, माळमाथा 25 गांव. 26 गांव पा.पु. योजना, चंदनपुरी व 32 गावांच्या वैयक्तीक पा.पु. योजना यांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

तसेच दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांची पत्रकार परिषद असून यानंतर मालेगावी दुपारीच्या सुमारास पोलीस मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली

दुपारी तीनच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे मालेगाव येथून गाडीने औरंगाबाद (संभाजीनगर) जिल्ह्यातील वैजापूरकडे रवाना होतील.

नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या मनमाड चौफुली येथील कार्यालयास ते भेट देतील. तसेच त्यांचा स्वागत सोहळा सायंकाळी सहाच्या सुमारास आमदार सुहास कांदे आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते येवला चौफुलीजवळ होणार आहे. यानंतर त्यांचा वैजापूरमध्ये मुक्काम असेल अशी माहिती देण्यात आली आहे.

दादा भुसे मालेगावचे असल्यानं विभागीय आढावा बैठक मालेगावमध्ये होणार आहेत. मात्र त्या आधीच मालेगावाचा जिल्हा असा उल्लेख करण्यात आलाय.

मालेगाव जिल्हा करण्याची गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे. दादा भुसे यांनी या आधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यांकडे मालेगाव जिल्हा करण्याची मागणी केलीय, एकनाथ शिंदें यांचाकडेही पहिली मागणी मालेगाव जिल्ह्या करण्याचीच केली आहे.

from maharashtra https://ift.tt/Lwf0yqE

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area