Aurangabad News: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहे. आजपासून एकनाथ शिंदेंचा दोन दिवसीय औरंगाबाद दौरा असणार आहे. त्यांच्या या संपूर्ण दौऱ्यात दोन राजकीय सभा आणि एक पत्रकार परिषद होणार आहे. तर मुख्यमंत्री विविध कार्यक्रमांना हजेरी सुद्धा लावणार आहे. सोबतच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात सर्वाधिक शिवसेनेचे आमदार औरंगाबाद जिल्ह्यातील होते. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंचा औरंगाबाद दौरा महत्त्वाचा समजला जातोय.

असा असणार मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 30 व 31 जुलै 2022 रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, 30 जुलै 2022 दुपारी 3 वाजता मालेगाव येथून मोटारीने वैजापूरकडे रवाना होतील. संध्याकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह, वैजापूर येथे आगमन व राखीव वेळ असणार आहे. त्यानंतर 6.30 वाजता वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे मुख्यमंत्री यांची जाहीर सभा होणार आहे. सभेनंतर रात्री 8 वाजता वैजापूर येथून मोटारीने औरंगाबादकडे रवाना होतील. 10 वाजता शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम असेल.

दुसऱ्या दिवशी रविवार 31 जुलै, 2022 रोजी सकाळी 10 ते 11.30 या वेळेत मुख्यमंत्री हे विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील पाऊस, अतिवृष्टी, पिक-पाणी व विकास कामे यांचा आढावा घेतील. त्यानंतर सकाळी 11.30 ते 12 या वेळेत पत्रकार परिषद घेतील. पत्रकार परिषद झाल्यावर दुपारी 12 ते 12.30 पर्यंत वेळ राखीव असणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री हे 12.30 वाजता औरंगाबाद येथून मोटारीने सिल्लोडकडे रवाना होतील.

सत्तारांच्या मतदारसंघात हजेरी...

सिल्लोड येथे पोहचल्यावर मुख्यमंत्री यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर सिल्लोडच्या नगर परिषदेच्या मैदानावर मुख्यमंत्री शिंदे यांची 3 वाजेच्या सुमारास जाहीर सभा पार पडेल. त्यानंतर ते औरंगाबादकडे रवाना होतील. शहरात आल्यानंतर मुख्यमंत्री वेगवेगळ्या महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करतील. दरम्यान आमदार संजय शिरसाट, संदिपान भुमरे आणि अतुल सावे यांच्या कार्यालयाला भेटी देऊन रात्री 11 वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री विमानाने मुंबईकडे रवाना होतील.

बंडखोर आमदारांकडून शक्तिप्रदर्शन

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये औरंगाबादच्या आमदारांची सर्वाधिक संख्या आहे. त्यातच गेल्या आठवड्यात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदार संघात शिवसंवाद यात्रा काढली होती. या यात्रेला मोठ्याप्रमाणात प्रतिसाद ही मिळाला होता. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यातून बंडखोर आमदारांकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

from maharashtra https://ift.tt/RWljgrK
Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर
July 29, 2022
0
Tags