Ashok Chavan : नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारने मागील महविकास आघाडी सरकारमधील कामांवर 'डिपीडीसी'च्या माध्यमातून घेतलेल्या निर्णयावर "स्थगिती" आणलीय. दरम्यान हे सरकार येताच राज्यशासनात जे निर्णय घेतले जात आहेत, त्यात राज्यातील विकासात्मक कामांना स्थगिती देण्याचा आरंभ झाला आहे. त्यामुळे शिंदे सरकार हे "स्थगिती देणारे सरकार अशी त्यांची प्रतिमा होऊ नये" अशी माझी अपेक्षा आहे असे माजी मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

"...त्यामुळे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार मानतो"
पुढे अशोक चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री असताना जेवढी कामे कदाचित झाली नसतील, तेवढी कामे अथवा त्याच्या पेक्षाही जास्त कामे, या माझ्या या दोन अडीच वर्षाच्या कार्यकाळात करता आली. त्यामुळे मी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार मानतो असे ते म्हणाले.

"पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलेय,त्यांच्यावर निश्चित कार्यवाही व्हावी"
तर विधान परिषद निवडणूक प्रसंगी ज्या काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केले त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केलीय. तर चंद्रकांत हंडोरे यांची सात मते फुटली हे जाणून बुजून झाले की कसे हे माहीत नाही, पण याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही चव्हाणांनी यावेळी केलीय.

"..त्यामुळे औरंगाबादचे हे नामकरण झाले असावे"
तर औरंगाबादचे संभाजीनगर नामांतरावरून बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, मागचा इतिहास जर पहिला तर ज्या पद्धतीने औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली होती हा इतिहास आहे. त्यामुळे जनसामान्य माणसामध्ये संभाजी महाराजांविषयी खूप मोठी आस्था आहे, त्यावरून त्यांचे नाव द्यावे ही मागणी सर्वत्र होती, त्यामुळे हे नामकरण झाले असावे असे ते म्हणाले.

नांदेड जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण?
तर नांदेड जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण असावे यावर बोलताना मिश्किल टिप्पणी करत चव्हाण म्हणाले की, नांदेडचे शिवसेनेचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांनी बंडखोरी करून जो त्याग केलाय, त्यामुळे त्यांनाच नांदेडचा पालकमंत्री करावे. असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

from maharashtra https://ift.tt/YxfZa4L
Ashok Chavan : शिंदे सरकारने स्वतःची प्रतिमा "स्थगिती सरकार अशी होऊ देऊ नये, अशोक चव्हाणांचा निशाणा
July 07, 2022
0
Tags