Cidco News : तळोजा फेज 2 येथे सिडकोच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्प उभारला जात आहे. शिर्के कंस्ट्रक्शन कंपनीकडून उभारण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या गृहप्रकल्पात झालेल्या अपघातात 4 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन कामगार जखमी आहेत.

कामगारांचा दुर्देवी मृत्यू, सिडको करणार चौकशी
साईटवरील लोखंडी क्रेनचे मोठे सामान खाली येवून आदळल्याने याखाली येवून कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर एका कारचेही नुकसान झाले आहे. ही घटना अत्यंत दुख:द असून संपूर्ण घटनेची सिडकोतर्फे चौकशी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

मृतांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई

मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 7 लाख तर गंभीर जखमींच्या कुटुंबियांना 2 लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश कंत्राटदार बी. जी. शिर्के यांना सिडकोतर्फे देण्यात आले आहेत. याचबरोबर जखमींवरील उपचारांचा खर्चदेखील कंत्राटदार बी. जी. शिर्के यांच्यातर्फे करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

from maharashtra https://ift.tt/235nOSi
Cidco News : सिडको गृहप्रकल्पात झालेल्या अपघातात 4 कामगारांचा जागीच मृत्यू तर दोन जखमी, होणार चौकशी
June 28, 2022
0
Tags