पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यामध्ये (Shaniwar Wada) नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni), राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील (Rupali Thombre Patil) आणि आरपीआयचे अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'मेधा कुलकर्णी जातीय सलोखा बिघडवण्याचं काम करतायत, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा', अशी थेट मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांनी काही संघटनांसोबत शनिवारवाड्यात जाऊन आंदोलन केल्यानंतर, अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी कुलकर्णींविरोधात आंदोलन करत त्यांच्यावर सामाजिक सलोखा बिघडवल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे, 'नमाज पठणामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील, तर शनिवारवाड्यातील मस्तानी दरवाजामुळे दुखत नाहीत का?' असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी मेधा कुलकर्णींना विचारला आहे.
from Kinnar Babu : किन्नर बाबू खानने तीन हजाराहून अधिक किन्नर मुंबईत आणल्याचा आरोप https://ift.tt/PHrWT5Y
Shaniwar Wada Row: 'खासदार Medha Kulkarni यांच्यावर गुन्हा दाखल करा', NCP च्या Rupali Thombre यांची मागणी
October 20, 2025
0