<p>Dasara Melava Uddhav Thackeray Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) आज दसरा मेळावा घेणार आहे. तर यंदा बंजारा समाजाकडूनही दसरा मेळावा घेण्यात येणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही गट दसरा मेळावे आयोजित करतात. त्याप्रमाणे आज ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava) दादर येथील शिवाजी पार्क येथे होणार आहे. य़ावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढल्यानंतर होणारा हा पारंपरिक दसरा मेळावा आहे.. दोन्ही भावांची जवळीक वाढली मात्र राजकीय युतीही होणार का? यासंदर्भात उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलंय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील नेस्को एग्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे होणार आहे. या मेळाव्याची वेळ सायंकाळी 6 वाजता असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाचा दसरा शेतकऱ्यांच्या बांधावर, स्थळ बदललंय परंपरा नाही…अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या ठिकाणाबद्दल माहिती देताना केली आहे. या मेळाव्यातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी मेळाव्याचं ठिकाणी आझाद मैदान ठरलेलं मात्र पावसामुळे मैदानात चिखल झाल्याने ठिकाण बदलण्यात आलं. </p>
from Abu Azmi Marathi Controversy : भिवंडीत मराठीची गरज काय? अबू आजमी बरळे;मनसे आक्रमक https://ift.tt/g7DUnEi
Dasara Melava Uddhav Thackeray Eknath Shinde: यंदा राज्यात पाच दसरा मेळावे; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंच्या भाषणाकडे लक्ष
October 01, 2025
0