Cough Syrup advisory Maharashtra: भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे लहान मुलांना ‘कफ सिरप’च्या वापराबाबत दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. या दिशानिर्देशाचे पालन करण्यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नागपूर शहरातील (Nagpur News) सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना पत्र दिले आहे. दुषित ‘कफ सिरप’मुळे (Cough Syrup) काही बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना पुढे आल्यानंतर भारत सरकारने यासंदर्भात दिशानिर्देश जारी केले. या दिशानिर्देशाचे शहरात पालन व्हावे यादृष्टीने मनपा आरोग्य विभागातर्फे रुग्णालयांना सूचना देण्यात आली आहे.

सद्यस्थितीत नागपूर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये 0 ते 16 वर्ष वयोगटातील संशयित मेंदूज्वराचे (एइएस) एकूण 12 रुग्ण विविध शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये भरती आहेत. यातील मध्यप्रदेशातील 10 व महाराष्ट्रातील 1 आणि तेलंगणाचा 1 रुग्ण आहे. यापैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मध्ये सहा रुग्ण उपचार घेत आहेत. एम्स मध्ये २ रुग्ण, न्यू हेल्थ सिटी हॉस्पिटलमध्ये १ रुग्ण, लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये १ रुग्ण, कलर्स हॉस्पिटलमध्ये १ आणि गेट वेल हॉस्पिटल १ रुग्ण उपचार घेत आहेत.

Cough Syrup Deaths: मेडिकल दुकानांमध्ये 'ते' विषारी औषध दिसले तर लगेच फोन करा, राज्य सरकारकडून टोल फ्री नंबर सुरु

कोल्डरिफ कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या कांचीपुरम युनिटमध्ये केलेल्या तपासणीत कोल्डरिफ कफ सिरपमध्ये 48.6% डायथिलीन ग्लायकोल आढळून आले होते. कप सिरपमध्ये हे प्रमाण अवघे 0.1 टक्के असणे अपेक्षित आहे. या विषारी कप सिरपमुळे अनेक लहान मुलांचे मुत्रपिंड निकामी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे मध्य प्रदेशात 14 मुलांचा मृत्यू झाला आहे, तर राजस्थानमध्ये 3 मुलांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात सावधानतेचा इशारा दिला होता. राज्य सरकारच्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून या प्रकरणीची दखल घेत खबरदारीचा उपाय म्हणून टोल फ्री नंबर सुरू करण्यात आला आहे. कोल्ड्रिप सिरप (MP Cough Syrup) हे मे 2025 ते एप्रिल 2017 या कालावधीतील औषध मेडिकलमध्ये असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांकवर माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Nagpur News: मुलांच्या मृत्यूनंतर नागपूरमधील प्रशासनाला खडबडून जाग

कफ सिरपमुळे लहान मुलांच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयच्या (DMER) पथकाने शासकीय मेडिकल रुग्णालयात पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला. DMER च्या चमू मध्ये बीजे महाविद्यालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ आरती किनीकर,जेजे महाविद्यालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ छाया वळवी,जे जे महाविद्यालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख भालचंद्र चिकलकर यांचा समावेश आहे.

यावेळी उपचार सुरू असलेल्या रुग्णांची स्थिती,त्यांच्यावर सुरू असलेले उपचार आणि मेडिकल हिस्ट्री तपासण्यात आली. तर 'एम्स नागपूर'च्या नेतृत्वात केंद्राच्या पथकाने छिंदवाडा जिल्ह्यातील परासीया तालुक्यात जाऊन पाहणी केली. कफ सिरपमुळे सर्वाधिक मुले परासीया तालुक्यातील प्रभावित झाली आहेत. केंद्रीय पथक पुढील तीन दिवसांत आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.

Nagpur Mystery Death: 10 मुलांच्या मृत्यूचं गूढ कायम, NIV रिपोर्ट कधी येणार?

* 10 बालकांच्या मृत्यूचे नेमके कारण काय?

* विदर्भ आणि मध्यप्रदेशातील छिंदवाडा परिसरात संशयित ए इ एस या मेंदूज्वराचे (Acute Encephalitis Syndrome) रुग्ण सापडत आहे का?

* असे असताना एइएस जापानी एन्सेफेलायटिस आणि चांडीपुरा व्हायरसचे चाचणी अहवाल नकारार्थी? मग मृत्यूचे नेमके कारण काय?

* पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील (NIV) तपासणी अहवाल केव्हा येणार?

आणखी वाचा

चिमुकल्यांना विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या डॉक्टरला बेड्या; नागपुरातही तीन लहानग्यांची मृत्यूशी झुंज, प्रशासन अलर्ट मोडवर

from Thane Municipal Corporation | ठाणे महापालिकेसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर https://ift.tt/PjkQW65
Cough Syrup advisory Maharashtra: विषारी कप सिरपमुळे लहान मुलांचे मृत्यू, नागपूर महानगरपालिकेने काढले महत्त्वाचे आदेश
October 06, 2025
0