Bhiwandi Fire Accident : भिवंडी शहर व ग्रामीण भागामध्ये आगीची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याचे समोर आलं आहे. भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील लोनाड ग्रामपंचायत हद्दीतील पॅरामाउंट वेअरहाऊस संकुलात (Paramount Warehouse Complex) रविवारच्या रात्रीच्या सुमारास भीषण आग (Fire Accident) लागली. या आगीत संकुलातील केमिकलगोदाम, ‘शॅडो फॅक्स’ व ‘बर्ड व्हिव’ कुरिअर गोदाम आगीचे भक्ष्यस्थानी पडले. रासायनिक पदार्थांचा मोठा साठा असल्याने आग (Fire) काही मिनिटांतच प्रचंड भडकली आणि ज्वाळांनी रौद्ररूप धारण केले. उंच उडणाऱ्या ज्वाळांमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

अग्निशामक दलाच्या 4 ते 5 गाड्या घटनास्थळी दाखल (Bhiwandi Fire Accident)

दरम्यान, आगीची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, ठाणे आणि जिंदाल स्टील कंपनीच्या अग्निशामक दलाच्या 4 ते 5 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र पाण्याची कमतरता भासत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. जर वेळेत पाणीपुरवठा झाला तर लवकरात लवकर आग आटोक्यात आणण्यात येईल. या आगीच्या तीव्रतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अजूनही सहा ते सात तास लागण्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सुदैवाने जीवितहानी टाळली, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक (Paramount Warehouse Complex Fire Accident)

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र वेअरहाऊस संकुलातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे. मात्र सतत घडणाऱ्या आगीच्या घटनांनी परिसरात भीतीच वातावरण आहे.

शॉर्ट सर्किटनं दुकानं जळून खाक, लाखोंचं झालं नुकसान (Bhandara Fire Accident)

भंडारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी चौकातील तिरुपती गिप्ट सेंटरला मध्यरात्री अचानक आग लागली. काहींना दुकानात आग लागल्याचं लक्षात येताच त्यांनी दुकानदारासह नगर पालिकेच्या अग्निशमन दलाला तातडीनं घटनेची माहिती दिली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आलं आल्यानं लगतची दुकानं या आगीच्या विळख्यातून वाचलीत. मात्र, या आगीत तिरुपती गिप्ट सेंटर पूर्णपणे जळून खाक झाल्यानं व्यावसायिकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbai Crime : बेंचखाली कॉपी आढळली, मुख्याध्यापिकेकडून विद्यार्थिनीचा अपमान, दहावीच्या मुलीचं टोकाचं पाऊल; धक्कादायक घटना

from Mohan Bhagwat Akhand Bharat | मोहन भागवत यांचा 'अखंड भारत' पुनरुच्चार https://ift.tt/MIjtbfY
Bhiwandi Fire Accident : भिवंडीत पुन्हा अग्नितांडव, पॅरामाउंट वेअरहाऊस संकुलात भीषण आग; केमिकल व कुरिअर गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी
October 05, 2025
0