<p><strong>Maharashtra Rain Live Updates:</strong> सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या शाळांना उद्या सुट्टी जाहीर. सोलापूर जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पाऊस आणि सीना नदीला पूरस्थिती निर्माण झाल्याने शाळांना सुट्टी. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर (ग्रामीण), माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व खासगी आणि शासकीय शाळांना सुट्टी. उद्या 23 सप्टेंबर रोजी एक दिवस सुट्टी जाहीर करत असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन सोमवारी रात्री धाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडाकडे रवाना. आज अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार. बीड, धाराशिव जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस, दोन दिवसाच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी </p>
from BLOG : नवरात्री विशेष! अहिल्यादेवींचं राज्यकारभार कौशल्य, 9 दिवस 9 प्रेरणागाथा https://ift.tt/CIvN9Wn
Maharashtra Rain Live: मुसळधार पावसामुळे सोलापूर, बीडमधील शाळांना सुट्टी जाहीर; पुढील 24 तास अतिवृष्टीचा अलर्ट
September 22, 2025
0