<p>पुढील दोन दिवस मुंबईत ओबीसी समाजासाठीच्या बैठकांचे सत्र. सरकारच्या जीआर मुळे साशंक असलेल्या ओबीसी नेत्यांची आज मुंबईत बैठक.. तर इतर मागास व बहुजन कल्याण मंत्र्यांनीही 9 सप्टेंबर रोजी ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी बोलावली बैठक..ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी "इतर मागास व बहुजन कल्याण" मंत्री अतुल सावे यांच्या विभागातर्फे 9 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी साडेचार वाजता मुंबईत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे... 4 सप्टेंबर रोजी नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता करताना इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी लवकरच शासन स्तरावर बैठक आयोजित केली जाईल असे आश्वासन दिले होते.. त्यानंतर या बैठकीचे मुंबईत आयोजन करण्यात येत आहे.</p> <p>दुसऱ्या बाजूला 8 सप्टेंबर रोजी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम मध्ये ही काही ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे.. मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या जीआर संदर्भात साशंक असलेल्या विदर्भातील ओबीसी नेत्यांची काल नागपुरात रविभवन येथे विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात बैठक झाली होती.. त्यात 8 सप्टेंबर रोजी मुंबईत राज्यभरातील ओबीसी नेत्यांची यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये बैठक घेण्याचे ठरले होते. </p> <p>त्यामुळे आता मुंबईत 8 सप्टेंबर रोजी सरकारच्या जीआर संदर्भात साशंक असलेल्या ओबीसी नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम मध्ये होईल.. तर दुसऱ्या बाजूला शासन स्तरावर ओबीसींच्या प्रलंबित मागण्यासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या वतीने 9 सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरकारने काढलेल्या जीआर मुळे ओबीसींच्या आरक्षणाला कुठेच धक्का बसत नसल्याचे आधीच म्हटले आहे.</p>
from Ganesh Visarjan | पुण्यात ३२ तास मिरवणूक, राज्यभरात १५ जणांचा मृत्यू https://ift.tt/BibZ61a
Maharashtra LIVE Updates: मुंबईत आजपासून ओबीसी नेते एकटवणार, पुढील दोन दिवस महत्त्वाच्या बैठका
September 07, 2025
0