Ads Area

Maharashtra live blog: महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी एकनाथ शिंदेंचा ठाणे पॅटर्न

<p><strong>Maharashtra live blog:</strong> महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली. पालिका निवडणूक जिंकण्यासाठी शिंदे मुंबईत राबवणार 'ठाणे पॅटर्न' विविध समाज, जात किंवा व्यवसायनिहाय असे २५ ते ३० सेल शिवसेनेत स्थापन करून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मायक्रो मॅनेजमेंटवर भर देणार जाणार. मुंबई महानगर पालिका निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेनेची अनोखी रणनिती ठाण्यानंतर मुंबईसाठी आखण्यात आली आहे. शिवसेनेशी संलग्न असलेली स्थानिक लोकाधिकार समिती महासंघ ही मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी काम करणारी संघटना माजी खासदार गजानन किर्तीकर यांच्या नेतृत्वात पुन्हा सक्रिय केली जाणार आहे.</p> <p>दहा हजारांहून अधिक सदस्य या संघटनेचे आहेत. मात्र सत्तांतरानंतर अनेकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय लोकाधिकार समिती मुंबई आणि महाराष्ट्रात स्थित विमा, तेल कंपन्या, विमान वाहतूक संघटना, रेल्वे संघटना, परिवहन संघटना, संशोधन , केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांच्या कार्यालयांमध्ये या संघटना सक्रिय केल्या जाणार आहे.समाजनिहाय सेल स्थापन करून त्याच समाजातील अडकलेले प्रश्न सोडून त्यांच्यातील एक लोकप्रतिनिधी नेमून, त्या त्या समाजाला संघठित करून त्या समाजाचा पाठिंबा निवडणुकीत मिळवण्याचा पॅटर्न ठाण्यात राबवला जात होता. हाच पॅर्टन मुंबई महानगर पालिका जिंकण्यासाठी शिंदे मुंबईत वापरणार असून पदाधिकार आणि नेते यांना या सेल स्थापना करण्याबाबत सूचनाही शिंदेंनी दिल्याची सूत्रांची माहिती</p>

from Garba Controversy: Virar च्या Viva College मध्ये 'लव्ह जिहाद'चा आरोप, अश्लील चॅटमुळे वाद पेटला https://ift.tt/wB6di04

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area