<p><strong>Maharashtra live blog:</strong> खामगाव शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे व त्यासाठी रस्त्याच्या बाजूने सात ते आठ फूट खोल नाली खोदली आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराने काम करत असताना कुठल्याही सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे दररोज अपघात घडत असून यात वृद्ध व लहान मुलं जखमी होताना दिसत आहे. रात्री खामगाव शहरातील बोबडे कॉलनी परिसरात शहरातील डॉ. ब्रह्मानंद टाले हे त्यांच्या कार ने जात असताना ड्रेनेजसाठी खोदून ठेवलेल्या नालीत त्यांची कार पलटी होऊन अपघात झाला. यात डॉ.ब्रह्मानंद टाले हे गंभीर जखमी झालेत. वारंवार शहरात ड्रेनेज लाईन साठी खोदून ठेवलेल्या नालीत वृद्ध लहान मुलं पडून अपघात होण्याचे प्रमाण वाढलं आहे. मात्र संबंधित कंत्राटदार कुठल्याही सुरक्षा नियमांचे पालन करत नाहीत त्यामुळे या कंत्राटदारावर कारवाईची मागणी खामगाव शहरातील नागरिक करत आहेत.</p>
from Traffic Jam Death | वाहतूक कोंडीमुळे चिमुकलीचा बळी, MNS चा Court मध्ये जाण्याचा इशारा https://ift.tt/sl0qUr6
Maharashtra live blog: ड्रेनेजसाठी खोदलेल्या नालीत पलटी होऊन कारचा अपघात
September 20, 2025
0