Maharashtra Live blog Updates: आशिया चषकमध्ये आज दुबईत भारत आणि पाकिस्तानदरम्यान मॅच होणार आहे. त्यावरून महाराष्ट्रात राजकीय सामना रंगलाय. ठाकरेंच्या शिवसेनेनं या मॅचला कडाडून विरोध केलाय. आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभरात माझं कुंकू माझा देश आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान यावर काल पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकार आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवला. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानशी क्रिकेटचा सामना म्हणजे शहिदांचा अपमान असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेेंनी केला. तसंच बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणाऱ्यांनी औकातीत राहावं, असा इशाराही त्यांनी दिलाय. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं हॉटेल मालक आणि व्यावसायिकांना भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना हॉटेल्समध्ये न दाखवण्याची विनंती केलीय. यावेळी हीच देशभक्ती दाखवण्याची खरी वेळ असून, सामना न दाखवून राष्ट्रप्रेम सिद्ध करण्याचं आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलंय. मुंबईसह मुंबई उपनगरात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केल्याने मुंबईकरांची एकाच तारांबळ उडाली आहे. तर पुढील 3 तासांत 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळ येण्याची शक्यता आहे.

from India-Pak Match Protest | Thackeray च्या Shiv Sena चा बहिष्कार, PM Modi ना 'Sindoor' आणि हॉटेल्सना इशारा https://ift.tt/kdU7X2C
Maharashtra Live blog Updates: भारत अन् पाकिस्तानच्या सामन्याला ठाकरे गटाचा विरोध; आज राज्यभरात माझं कुंकू माझा देश आंदोलन
September 13, 2025
0
Tags