Jalgaon Crime Woman suicide: पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणाच्या आठवणी ताज्या असतानाच आता जळगावमध्ये सासरच्यांकडून हुंड्यापायी होणाऱ्या छळामुळे एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगावच्या सुंदरमोती नगरमध्ये राहणाऱ्या मयुरी गौरव ठोसर (वय 23) या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या (Suicide News) केली. अवघ्या 4 महिन्यांपूर्वी म्हणजे 10 मे रोजी तिचे लग्न झाले होते. मात्र, चार महिन्यांमध्ये झालेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून मयुरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 9 सप्टेंबरला मयुरीचा वाढदिवस होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी 10 सप्टेंबरला कोणीही घरात नसताना मयुरीने गळफास घेतला. तिच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Jalegaon News)

मयुरीने आत्महत्या केल्याची बातमी कळाल्यानंतर तिचे आई-वडील जळगावला गेले. ग्रामीण जिल्हा रुग्णालयात आपल्या मुलीचा मृतदेह पाहिल्यानंतर या दोघांनी एकच टाहो फोडला. मयुरीच्या आईने सांगितले की, 'मुलाकडच्यांना लहान नाही तर मोठा हॉल पाहिजे होता. लग्नात जेवायला गुलाबजाम हवा होता. आम्ही आत्तापर्यंत त्यांना 10 लाख रुपये दिले.' मात्र, यानंतरही सासरच्या मंडळींकडून मयुरीचा छळ सुरु होता. मयुरीने बुधवारी आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या बहिणीला फोन केला होता. त्यानंतर तिने गळफास लावून घेतला.

या घटनेनंतर मयुरीच्या कुटुंबीयांनी पती गौरव ठोसर याच्यासह सासू, सासरे, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. आरोपींना अटक न झाल्याने शवविच्छेदन करु न देण्याचा पवित्रा नातेवाईकांनी रुग्णालयात घेतला होता. जोपर्यंत मयुरीच्या सासरच्यांना अटक होत नाही तोपर्यंत आपण मृतदेह स्वीकारणार नाही, असेही मयुरीच्या आई-वडिलांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मयुरीच्या माहेरच्या कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

Married Woman Suicide: मयुरीच्या सासूवर गंभीर आरोप

मयुरीच्या आईने आपल्या मुलीचा मृतदेह पाहिल्यानंतर रडत-रडत तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांविषयी सांगितले. यावेळी मयुरीच्या सासूवर आईने गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की,' मयुरीची सासू गोड बोलणारी होती. तिने गोड बोलून बोलून आमच्याकडून 10 लाख रुपये उकळले. माझी मुलगी खूप हुशार होती, शाळेत तिचा नेहमी एक नंबर यायचा. ती आत्महत्येसारखं पाऊल उचलू शकत नाही. माझ्या मुलीसोबत जे घडलं, ते दुसऱ्या कुठल्याही मुलीसोबत घडू नये', असे मयुरीच्या आईने म्हटले.

आणखी वाचा

गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणात खळबळजनक दावा, नर्तकी पूजा गायकवाड अन् राजकारण्यांनी मिळून...

from Kolhapur Shahi Dussehra State Festival | Shahi Dussehra ला प्रमुख दर्जा, Mysore प्रमाणे महत्त्व https://ift.tt/LYewOZD
Jalgaon Crime: लग्नात सासरच्यांनी मोठा हॉल मागितला, जेवणात गुलाबजाम अन् 10 लाख दिले, पण चार महिन्यांत मयुरीने आयुष्य संपवलं
September 11, 2025
0