<p><strong>Maharashtra Live Blog Updates: </strong>मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत होता. गेल्या चार दिवसांच्या तुलनेत बुधवारी काही भागात पावसाचा जोर कमी झाला. दरम्यान, संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. काही भागात अधूनमधून हलक्या सरी ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. काही भागात जनजीवन विस्कळित झाले. राज्यातील बहुतांश भागात मात्र, बुधवारी पावसाचा जोर कमी होता. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळला. मात्र, मुंबई, ठाणे परिसरात बुधवारी पाऊस ओसरला होता. दरम्यान, संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. तसेच राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोघे एकत्र आल्यामुळे यंदाची बेस्ट पतपेढीची निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि महायुतीच्या पॅनेलमध्ये मुख्य लढाई होईल, असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज चुकवत शशांक राव यांच्या पॅनेलने 21 पैकी 14 जागा जिंकत बाजी मारली. महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलने 7 जागांवर विजय मिळवला. तर ठाकरे बंधूंना भोपळाही फोडता आला नाही.</p>
from Mumbai Electrocution | भांडूपमध्ये 'Headphone'मुळे तरुणाचा जीव, महावितरणवर टीका https://ift.tt/sXAD3jQ
Maharashtra Live Blog Updates: राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरणार
August 20, 2025
0