<p><strong>Maharashtra Live Blog Updates: आज मुंबईत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्र मेळावा होणार आहे. बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येत आहेत. तर बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात म्हाडाकडून येथील ५५६ रहिवाशांना आज चावी वाटप केले जाणार आहे. आज सकाळी अकरा वाजता यशवंत नाट्यमंदिर येथे 556 लाभार्थ्यांना चावी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. मुंबईत वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथे बीडीडी चाळी असून, त्यांचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज एकाच मंचावर येणार आहेत. या बातम्यांसह राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.</strong></p>
from Rahul Gandhi Special Report | राहुल गांधींच्या वकिलांचा 'जीव धोक्यात', दावा निष्फळ? https://ift.tt/pbemaQw
Maharashtra Live Blog Updates: एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे आज एकाच मंचावर येणार
August 13, 2025
0