Eknath Shinde on CP Radhakrishnan : उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन (C P Radhakrishnan) यांची उमेदवारी जाहीर केली. शिवसेना NDA मधला घटक पक्ष आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला फोन करून याबाबतीत स्वतः चर्चा देखील केली. त्यामुळे शिवसेनेचा उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी.पी राधाकृष्णन यांना पूर्ण पाठिंबा आहे, समर्थन आहे. त्यांना अँडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

सीपी राधाकृष्णन व्हिजन असलेला नेता म्हणून त्याचं नावलौकिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात पार पडली. या बैठकीनंतर भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर केलं. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले कि, सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत असताना त्यांना संसदीय कामकाजाचा अनुभव आहे. त्यांनी अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केल आहे. त्यांनी अनेक पद भूषवले आहे. त्यांनी महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून चांगलं काम केलं आहे. व्हिजन असलेला नेता म्हणून त्याचं नावलौकिक आहे. ते उमेदवारीला पात्र म्हणून ठरतील. त्यांची कारकीर्द उज्वल आणि यशस्वी होईल, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये सीपी राधाकृष्णन राज्यपाल म्हणून आले त्यावेळी सरकार आणि आमची जी बाँडिंग होती ती चांगली होती. राज्याला मार्गदर्शक म्हणून काम करणारे राज्यपाल म्हणून त्यांचा नावलौकिक होता. महाराष्ट्राचे राज्यपाल ते देशाचे थेट उपराष्ट्रपती हे सन्मान गौरव त्यांना मिळाला आहे. महाराष्ट्राला अभिमान आहे, आम्हाला अभिमान आहे. चांगल्या व्यक्तिमत्त्वाला उपराष्ट्रपतीपदाची संधी मिळालेली आहे. असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

संबंधित बातमी:

CP Radhakrishnan : महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाचे NDA चे उमदेवार, इंडिया आघाडीतून पहिली प्रतिक्रिया समोर

from Voter Adhikar Yatra | राहुल गांधींची Bihar मध्ये 'Election' यात्रा सुरू https://ift.tt/4gAOTxi
Eknath Shinde : अमित शाहांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन; महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना शिवसेनेचा पाठिंबा
August 17, 2025
0