Ads Area

Mumbai Crime: मुंबईत गे रिलेशनशिपमधील प्रसिद्ध CAचं टोकाचं पाऊल, शरीरसंबंधांची क्लीप व्हायरल करण्याची धमकी, 22 वर्षांच्या तरुणीला अटक

Mumbai Crime News: मुंबईच्या वाकोला परिसरातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात समलैंगिक संबंधाची अश्लील चित्रफित प्रसारित करण्याची धमकी देत दोघांनी तब्बल 3 कोटी रुपयांची खंडणी (Extortion) उकळल्याचा प्रकार उजेडात आला आहे. मात्र सततच्या त्रासाला कंटाळून अखेर हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या चार्टर्ड अकाउंटंटने (Chartered Accountant) टोकाच पाऊल उचललं आणि विष प्राशन करून आत्महत्या केलीय. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी दोघांविरोधात (Mumbai Crime) आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप, दोघांना अटक

पुढे आलेल्या माहितीनुसार, वाकोला परिसरात नामांकित चार्टर्ड अकाउंटंटला शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करून ब्लॅकमेलिंग करण्याची धमकी देत करोडोंची खंडणी उकळणाऱ्या दुकलीस वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पीडित तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोपही या दुकलीवर करण्यात आला आहे. राहुल शेरू पारवाणी (वय 26) आणि सभा इकबाल अहमद कुरेशी (22) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांच्याविरुद्ध वाकोला पोलीस ठाण्यात कलम 108, 308(2), 308(3), 3(5) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्लील चित्रफित तयार करून ब्लॅकमेलिंग

प्राथमिक माहितीनुसार, चार्टर्ड अकाउंटंट राज मोरे (वय 32) हा आपल्या आईसोबत सांताक्रूझ येथे रहात होता. तर तो शीव येथील एका कंपनीत कामालाही होता. राज मोरे याची इन्स्टाग्रामच्या समाजमाध्यमावर राहुल पारवानी याच्यासोबत सप्टेंबर 2024 मध्ये ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री फुलली आणि त्यानंतर ते दोघे नियमित भेटत होते. अशातच या दोघांचे शारिरीक संबंध होते. मात्र राहुलची सहकारी सबा कुरेशी याने या संबंधाची अश्लील चित्रफित तयार केली. या चित्रफितीच्या आधारे राहुल आणि सबा हे दोघे राज मोरे याला ब्लॅकमेल करीत होते. त्यातूनच ही खंडणी मागण्यात येत होती. मात्र सततच्या त्रासाला कंटाळून अखेर हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या चार्टर्ड अकाउंटंटने टोकाच पाऊल उचललं आणि विष प्राशन करून आत्महत्या केलीय. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/lAMi1wx Padalkar VIDEO : सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा अन् आई दुसरीच, पुण्यात एक कॉकटेल घर; पवार कुटुंबीयांचे नाव न घेता भाजपचे गोपीचंद पडळकर बरळले

भरधाव रेल्वेने स्कूल बसला उडवले; कर्मचाऱ्यास प्रादेशिक भाषा येत नसल्यानेच दुर्घटना, डीएमके नेत्याचा दावा

from Monsoon Session Protest: विधानभवनात विरोधकांचा 'धमाका', नेत्यांना 'टार्गेट' करत घोषणाबाजी https://ift.tt/gS3f8HP

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area