<p>Maharashtra Live blog updates: बीडच्या शिरूर तालुक्यातील वडळी गावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले. काही तासानंतर अपहरण झालेली मुलगी अज्ञातस्थळी हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस घटनेचा अधिक शोध घेत आहेत. </p> <p>अनिल घोरपडे आपल्या कुटुंबासमवेत वडळी गावात वास्तव्यास आहेत. त्यांना एक 17 वर्षाची मुलगी असून 11 महिन्यांच्या कालखंडात दोन वेळा या कुटुंबासोबत ही घटना घडली. घराच्या अंगणातून मुलगी एकटी असताना तिचे अपहरण होते.. आणि अज्ञातस्थळी मुलगी हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून येते.. या प्रकारामुळे कुटुंबीय भयभीत असून याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून या प्रकारामुळे मात्र परिसरात खळबळ उडाली आहे.</p>
from MNS Meeting Postponed | रंगशारदा मेळावा पुढे ढकलला, पक्षीय बदलांचे संकेत https://ift.tt/TxF30dt
Maharashtra Live: बीडमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण, निर्जनस्थळी हातपाय बांधलेल्या अवस्थेत सापडली
July 26, 2025
0