वैष्णवी आत्महत्येप्रकरणी सात दिवसांनंतर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अटक, दोघांनाही 28 मे पर्यंत पोलीस कोठडी

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली कस्पटे कुटुंबीयांची भेट, संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत कुटुंबीयांचं केलं सांत्वन.

वैष्णवी हगवणे प्रकरणात कुणाचीही हयगय केली जाणार नाही. कस्पटे कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर अजित पवारांचं आश्वासन.

हगवणेचा साथिदार आणि बाळ सुपूर्द करण्यात आडकाठी आणणाऱ्या निलेश चव्हाणला शोधण्यासाठी विशेष पोलीस पथक. पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर अजित पवारांची माहिती.

वैष्णवी आत्महत्या प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवणार. अजितदादा मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा.

वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपी राजेंद्र आणि सुशील हगवणेची थार गाडी पोलिसांकडून जप्त. याच गाडीत गुन्ह्यानंतर प्रवास. आता इंडेव्हर आणि बलेनो गाड्यांची जप्ती कधी होणार, याकडे लक्ष.

राजेंद्र हगवणेला झालेली अटक ही पोलिसांच्या माध्यमातून. मंत्री योगेश कदमांची प्रतिक्रिया. कुठलंही राजकारण न करता आम्ही कारवाई केली. योगेश कदमांची माहिती.

महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट नाराज.हगवणे प्रकरणात महिला आयोगाच्या भूमिकेवरून टीका होत असल्याने पक्षातला एक गट अस्वस्थ. नाराज गटाने चाकणकरांची तक्रार अजित पवारांकडे केली.

भाजप महिला आघाडीचं शिवाजी नगर कोर्टाबाहेर आंदोलन, राजेंद्र हगवनेला फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी.

वैष्णवी हगवणे प्रकरण अतिशय गंभीर. निलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया. या प्रकरणी उज्वला पवार यांची नियुक्ती करावी अशी कस्पटे कुटुंबाची मागणी असल्याची माहिती.

हगवणे कुटुंबीयांचं वकिल पत्र कोणीही घेऊ नका, राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसेंची वकिलांना विनंती.

पुण्यात हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी मराठा समाजाचा पुढाकार. वैष्‍णवीच्‍या आत्‍महत्‍येस जबाबदार असलेल्‍या सर्वांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे मराठा समाजाची मागणी.

६ जूनला तारखेनुसार होणारा शिवराज्याभिषेक सोहळा बरखास्त करा, संभाजी भिडेंचं वक्तव्य, तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत, संभाजी भिडेंनी केली मागणी.

इतिहास मोडायचा आणि नवीन निर्माण करायचा असा काहींचा प्रयत्न, शिवराज्याभिषेक सोहळ्याचं दु:ख वाटणं चुकीचं, संभाजी भिडेंच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांची प्रतिक्रिया.

from Ajit Pawar Full PC : हगवणे पिता-पुत्राला कसं ट्रॅक केलं, अजितदादांनी सगळंच सांगितलं https://ift.tt/5ycaMe8
100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 24 मे 2025
May 23, 2025
0