वसई : सायबर फसवणुकीविषयी सातत्याने जनजागृती होत असली तरीही, चतुर भामटे अजूनही उच्चशिक्षित व्यक्तींनाही सहजपणे आपल्या जाळ्यात ओढताना दिसत आहेत. वसईतील एका 52 वर्षीय महिला वकिलांची तब्बल 50 लाख रुपयांची फसवणूक ‘डिजिटल अरेस्ट’ या नव्या स्वरूपाच्या सायबर गुन्ह्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

ही घटना 25 मार्च रोजी घडली. फिर्यादी महिलेला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला सीबीआय अधिकारी म्हणून ओळख दिली. त्याने महिलेला सांगितले की, त्यांच्या नावाने आधारकार्डाचा गैरवापर करत एक मोबाईल सिम घेतले गेले असून त्या नंबरवरून अश्लील संदेश पाठवले गेले आहेत. एवढ्यावरच न थांबता, दिल्लीत एचडीएफसी बँकेत त्यांच्या नावावर एक बोगस खाते उघडण्यात आले असून त्यात मनी लॉंड्रींगची संशयित रक्कम जमा करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

8 दिवसांत 50 लाखांची उकळपट्टी

या प्रकरणाची गंभीरता भासवण्यासाठी आरोपीने व्हिडिओ कॉल करत बनावट सीबीआय ऑफिसचे दृश्य दाखवले. त्यामुळे त्या महिलेला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला. त्यानंतर, कारवाई टाळण्यासाठी आणि नाव साफ करण्यासाठी, महिलेला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ८ दिवसांत एकूण 50 लाख 38 हजार रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.

चार अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढे त्यांना संशय आल्यावर त्यांनी तात्काळ वसई पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली. सध्या या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात चार अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, सायबर गुन्हेगार त्यांच्या बनावट आणि तंत्रस्नेही योजनांद्वारे कोणालाही लक्ष्य करू शकतात. नागरिकांनी अशा प्रकरणांबाबत अधिक सतर्क राहणे आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या फोनवर विश्वास न ठेवणे, ही काळाची गरज आहे.

विमानाच्या बाथरूममध्ये विमान बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचे पत्र

जयपूरहून मुंबईला येणाऱ्या इंडिगो विमानाच्या बाथरूममध्ये विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे पत्र सापडल्यान एकच खळबळ उडाली आहे. विमान उतरल्यानंतर, एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना बाथरूममध्ये हे पत्र मिळालं आहे. प्रवासी उतरल्यानंतर रात्री 9 च्या सुमारास, विमानाच्या बाथरूममध्ये मिळालेल्या या धमकीच्या पत्राची माहिती पोलिसांना दिल्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. फ्लाइट कपची तपासणी केली असता, पोलिसांना काहीही संशयास्पद आढळले नाही. दरम्यान, पोलीस आता हे पत्र बाथरूममध्ये कोणी ठेवले आणि त्यामागील कारण काय होते? हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

'मराठीला गोळी मारा', नायगावमधील सोसायटी सेक्रेटरीकडून महिलेला जातीवाचक शिवीगाळ, तक्रार दाखल

from Amit Gorkhe on Deenanath Mangeshakar Hospital | चूक असेल म्हणूनच डॉ. घैसास यांनी राजीनामा दिला https://ift.tt/LRfwmoc
Vasai Crime News : वसईत उच्चशिक्षित महिला वकील ‘डिजिटल अरेस्ट’च्या फसवणुकीचा बळी; 8 दिवसांत 50 लाखांची उकळपट्टी
April 07, 2025
0