Tahawwur Rana: मुंबईतील 26/11 बॉम्बस्फोट हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाला (Tahawwur Rana) 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या विशेष न्यायालयात तहव्वूर राणाच्या रिमांडवर सुनावणी झाली आहे. आता तहव्वूर राणाची चौकशी देखील होऊ शकते. एनआयएच्या विशेष न्यायलयानं हा निर्णय दिला आहे. एनआयएनं तहव्वूर राणाच्या 20 दिवसांची कोठडी मागितली होती. अखेर तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. दिल्लीच्या विशेष न्यायालयात राणाच्या रिमांडवर सुनावणी झाली. पहाटे अडीच वाजताच्या सुमारास तहव्वूर राणाला घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांचा ताफा दाखल झाला. त्यानंतर विशेष एनआयए कोर्ट न्यायाधीश चंदेर जित सिंह यांनी तहाव्वुर राणाला 18 दिवसांची कोठडी सुनावली.

#WATCH | Delhi: 26/11 Mumbai attacks accused Tahawwur Rana brought to National Investigation Agency headquarters

Rana will remain in NIA custody for 18 days, during which time the agency will question him in detail in order to unravel the complete conspiracy behind the deadly… pic.twitter.com/8mUKEEN7kz
— ANI (@ANI) April 10, 2025

कसाबप्रमाणे तहव्वुरला फाशीच व्हावी-

सतरा वर्षांपूर्वी मुंबईवर अतिरेकी हल्ला करण्यासाठी पाकिस्तानला मदत करणाऱ्या तहव्वूर हुसैन राणाला अमेरिकेच्या ताब्यातून काल (10 एप्रिल) खाजगी जेटने भारतात आणलं गेलं. कट कारस्थानात कोण कोण सहभागी होतं याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणा त्याच्याकडून मिळवेल. कसाबप्रमाणे तहव्वुरला फाशीच व्हावी अशी भावना प्रत्येक भारतीयाची असेल.

राणाची प्राथमिक चौकशी दिल्लीतल्या एनआयएच्या मुख्यालयातच-

एनआयएचे प्रमुख सदानंद दातेंवर राणाच्या प्रत्यर्पणासह चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आलीय. विशेष म्हणजे 26/11 च्या हल्ल्यात स्वतः दातेंनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता. सदानंद दातेंनी आपल्या छोट्या टीमसह कामा रूग्णालयावर हल्ल्याला तोंड दिलं होते. हल्ल्यात स्वतः जखमी झालेल्या दातेंनी त्यावेळी अनेकांचे प्राण वाचवले होते. राणाची प्राथमिक चौकशी दिल्लीतल्या एनआयएच्या मुख्यालयातच होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याच्यावर मुंबईत खटला चालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

तव्वहूर राणाच्या प्रत्यर्पणानंतर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया-

आम्हाला या गतिशीलतेचा अभिमान आहे. भारत आणि अमेरिका दहशतवादाचा सामना करण्यासाठी कटिबद्द असल्याची प्रतिक्रिया अमेरिका परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता टॅमी ब्रूस यांनी दिली आहे. 9 एप्रिल रोजी, युनायटेड स्टेट्सने तहव्वुर हुसैन राणाला भारताला प्रत्यार्पण केले, जेणेकरून त्याला 2008 च्या मुंबईतील भयानक दहशतवादी हल्ल्यांच्या कटातील भूमिकेसाठी न्यायाला सामोरे जावे लागेल. या हल्ल्यांमुळे 166 जणांचा मृत्यू झाला, ज्यात सहा अमेरिकन नागरिकांचा समावेश होता, ज्याने संपूर्ण जगाला धक्का बसला. युनायटेड स्टेट्सने या हल्ल्यांसाठी जबाबदार असणाऱ्यांना न्यायाच्या कक्षेत आणण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना नेहमीच पाठिंबा दिला आहे, आणि जसे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे, युनायटेड स्टेट्स आणि भारत दहशतवादाच्या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी एकत्र काम करत राहतील. तो त्यांच्या ताब्यात आहे, आणि आम्हाला या गतिशीलतेचा खूप अभिमान आहे, असं टॅमी ब्रूस म्हणाले.

तहव्वूर राणाला यूएपीए कायद्यांतर्गत अटक, VIDEO:

संबंधित बातमी:

कोण आहे तहव्वुर राणा?

from Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 09PM : 10 April 2025: ABP Majha https://ift.tt/NOMd1o5
Tahawwur Rana: तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी; चौकशीला होणार सुरुवात, अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
April 10, 2025
0