केंद्र सरकारकडून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या 'एनएमएमएस' परीक्षेत मास कॉपी ? धाराशिव मधील लोहारा येथील वसंतदादा पाटील विद्यालयातील परीक्षा केंद्रावर मास कॉफी झाल्याचा आरोप. लोहारा येथील एकाच परीक्षा केंद्रावर परीक्षा दिलेल्या 271पैकी 115 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक, अनेक विद्यार्थ्यांना समसमान गुण. तर जिल्हाभरातील इतर 12 परीक्षा केंद्रावरील 6264 विद्यार्थ्यांपैकी 90 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

देशाच्या स्वातंत्र्यानंतर अजूनही काही अशी गावे आहेत की, जिथे अद्यापही रस्ते किंवा विजेची सुविधा उपलब्ध नाही.रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असणाऱ्या वडमालवाडीला सुद्धा 76 वर्षांच्या देश स्वातंत्र्यानंतर अनेक सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले होते.या 76 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर या गावाला आता रस्ता मिळालाय.आय.एस. ओ. प्रमाणित ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या दुष्मी खारपाडा ग्रामपंचायत मध्ये वसलेल्या या वाडीला राजकीय मतांची पोळी भाजणाऱ्यांनी कायम अंधारातच ठेवलं. मात्र 76 वर्षांच्या लढ्यानंतर या अखेर गावकऱ्यांना अखेर यश आलं आहे.आता गावात रस्ता बनतोय त्यामुळे येथील नागरिकांच्या मनात आनंद दिसतोय.

from ABP Majha Headlines 06 PM Top Headlines 06 PM 6 April 2025 दुपारी 06 च्या हेडलाईन्स https://ift.tt/X9bSRKZ
Maharashtra Live Updates: 'एनएमएमएस' परीक्षेत मास कॉपी? धाराशिवमधील महाविद्यालयात गैरप्रकार
April 06, 2025
0