Ads Area

Disha Salian Death Case: दिशाची सामूहिक अत्याचार करुन हत्या, पालकांचा आरोप; याचिकेत आदित्य ठाकरेंचंही नाव, किशोरी पेडणेकर म्हणाल्या...

Disha Salian Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची (Disha Salian Death Case) नव्यानं चौकशी करण्याची मागणी तिच्या आई-वडिलांनी केलीय. दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

दिशा सालियनच्या पालकांनी दाखल केलेल्या याचिकेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), सूरज पांचोली, दिनो मौर्या यांच्यासह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आलेत. मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास एनआयएसारख्या संस्थेकडून करण्यात यावा अशी मागणी दिशाच्या आईवडिलांनी केलीय. समीर वानखेडेसारख्या अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात तपासाची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मी उघड उघड त्यांच्या घरी गेली होती- किशोरी पेडणेकर

दिशा सालियनच्या वडिलांनी काहीही आरोप करो. तिच्या मृत्यूनंतर मी त्यांच्या घरी गेली होती. मी उघड उघड त्यांच्या घरी गेली होती. त्यावेळी माध्यमे देखील होती. दिशा सालियनच्या पालकांसोबत मी उघड उघड चर्चा केली. त्यांची बायको वेगवेगळ्या चटण्या बनवते, यावरुन देखील दिशा सालियनच्या वडिलांसोबत चर्चा झाली, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

महापौर बंगल्यावर भेटले, मला फोनही केले- किशोरी पेडणेकर

आता महानगरपालिका निवडणुका येत आहेत. एक आरोप केला, तो मागे पडला, त्यानंतर आता दुसरा आरोप केला जातोय. दिशा सालियनच्या वडिलांनी महापौर बंगल्यावर येऊन मला विनंती केली होती. तिच्या वडिलांनी लेखी दिलं होतं, अनेकदा मला फोनही आले होते, अशी माहिती किशोरी पेडणेकरांनी दिली.

आमच्यावर खोटेपणाचा आरोप करणारे आता काय करणार?; नितेश राणेंचा सवाल

दिशा सालियन प्रकरणावरून नितेश राणेंनी नेहमीच आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. दिशाच्या वडिलांनी पुन्हा हायकोर्टात धाव घेत तपास करण्याची विनंती केल्यानंतर नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. दिशा सालियनची हत्या झाली होती आणि तिच्या वडिलांन आज जी नावं घेतली ती पहिल्या दिवसांपासून सांगत होतो, त्यामध्ये आदित्य ठाकरेंचा हात आहे असा  आरोप भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केला. तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी काय काय केलं होतं हे दिशाच्या वडिलांनी याचिकेतून सांगितलं आहे. त्यावेळी आमच्यावर खोटेपणाचा आरोप करणारे आता काय करणार असा प्रश्नही नितेश राणे यांनी केला.

दिशा सालियनची फाईल उघडणार?, VIDEO:

संबंधित बातमी:

<a href="https://ift.tt/rI8lgOd Salian : अर्णब गोस्वामी, नितेश राणेंच्या आरोपात तथ्य, दिशा सालियान मृत्यूचा समीर वानखेडेंसारख्या अधिकाऱ्यांकडून तपास करावा; वडिलांची नव्याने याचिका

from Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर https://ift.tt/8HqBwe9

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area