पुणे: पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका 26 वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दत्तात्रय गाडे या सराईत गुन्हेगाराने फलटणला आपल्या गावी जाण्यासाठी निघालेल्या या तरुणीला आपल्या जाळ्यात ओढून तिला शिवशाही बसमध्ये (Shivshahi Bus) नेले होते आणि तिच्यावर बलात्कार (Pune Rape) केला होता. दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याने या तरुणीवर एकदा नव्हे तर दोनवेळा बलात्कार केल्याची धक्कादायक बाब तरुणीच्या वैद्यकीय तपासणीतून समोर आली आहे. नराधम दत्तात्रय गाडे याचा स्वारगेट डेपोत (Swargate Depot) नेहमी वावर असायचा, अशी माहिती समोर आली आहे. इनशर्ट, शूज, मास्क अशा वेषात तो याठिकाणी यायचा. अनेकांना तो आपण पोलीस असल्याचे भासवायचा. पोलीस असल्याचे सांगून दत्तात्रय गाडे याने अनेक मुलींना यापूर्वी आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याशिवाय, तो एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा कार्यकर्ता असल्याचीही माहिती समोर आली आहे. दत्तात्रय गाडे याचा राजकीय व्यक्ती आणि पोलिसांशी संपर्क असायचा. त्यामुळेच दत्तात्रय गाडे याच्यात स्वारगेट डेपोसारख्या मध्यवर्ती ठिकाणी तरुणीवर बलात्कार करण्याची हिंमत आली असावी, अशी चर्चा आता सुरु आहे.

दैनिक 'महाराष्ट्र टाईम्स'च्या वृ्त्तानुसार, नराधम दत्तात्रय गाडे हा पीएमपी बस आणि एसटी स्थानकांवर कायम रेंगाळत असायचा. येथील तरुण मुलींना तो आपण पोलीस असल्याचे सांगायचा. मात्र, प्रत्यक्षात दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर साखळी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यासाठी तो तुरुंगातही जाऊन आला आहे. दत्तात्रय गाडे याचा ट्रॅक रेकॉर्ड आणि त्याने केलेले कृत्य पाहता त्याने यापूर्वीही आणखी कोणत्या मुलीसोबत असे कृत्य केले आहे का, याचा शोध घेतला जात आहे. दत्तात्रय गाडे हा पुण्यातील काही राजकीय व्यक्ती आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित राजकीय व्यक्ती आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडून दत्तात्रय गाडेविषयीची माहिती काढली जात आहे. पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या भावाचीही पोलीस चौकशी केली होती.

मंगळवारी पहाटे दत्तात्रय गाडे याने पीडित तरुणीला एसटी आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. घटनेच्या दिवशी गाडे रात्री दीड-दोन वाजल्यापासून एसटी स्टँडच्या परिसरात फिरत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. दत्तात्रय गाडे याला शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी एकूण आठ पथके कामाला लावली आहेत. दत्तात्रय गाडे हा पुण्यालगत असलेल्या शेतांमध्ये लपला असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांकडून डॉग स्क्वॉडची मदत घेऊन तपास केला जात आहे.

आणखी वाचा

स्वारगेट बस डेपोत तरुणीवर एकदा नव्हे दोनवेळा अत्याचार, मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड

from Ravindra Dhangekar on Pune Crime : विद्येचे माहेरघर पुण्यात मुली असुरक्षित धंगेकर https://ift.tt/vxyOXrh
Pune Crime Swargate bus depot: स्वारगेट बस डेपोत तरुणीवर अत्याचार करणारा नराधम बड्या नेत्याचा कार्यकर्ता, पोलिसांशी ओळखी; धक्कादायक माहिती उघड
February 26, 2025
0