Maharashtra Weather: देशभरात होळीनंतर खरा उन्हाचा चटका बसायला सुरुवात होते. पण यंदा देशभरात होळीपूर्वीच उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहे. सर्वाधिक तापमानाच्या नोंदी होत असून उकाडा, घामाच्या धारा आणि उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागलाय.महाराष्ट्रात कमाल तापमान हळूहळू 40 अंश सेल्सियसचा पल्ला गाठू लागलंय. किमान तापमानातही वाढ होताना दिसत आहे.(Temperature) दरम्यान, रविवार (23 फेब्रुवारी) आणि सोमवारी (24) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. येत्या दोन दिवसांत उर्वरित ठिकाणी कडाक्याचं ऊन आणि शुष्क वाऱ्यांमुळे तापमानवाढीचा अंदाज आहे. (Maharashtra temperature)

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार,सध्या इशान्य भारतात सध्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मेघालय, पश्चिम बंगाल,ओडिशा या राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलाय. पूर्वेकडील वाऱ्यांमुळे केरळ ते मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सरकल्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी लागणार असल्याचं सांगण्यात आलंय. (Rain Alert)

मुंबई, पुण्यात उन्हाचा तडाखा

मुंबईत उन्हाचा तडाखा बसायला सुरुवात झालीय. शनिवारी मुंबईचा पारा 37 अंशांच्या पार गेला होता.कुलाब्यात तापमानाचा पारा 35 अंश सेल्सियस होता. तर ठाण्यात 37 अंश कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईत कमाल तापमानासह किमान तापमानही चढेच नोंदवले जात आहे. पुण्यात कमाल तापमानाचा पारा आता चांगलाच वाढला असून शिवाजीनगर भागात शनिवारी (22) 36.2 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. तळेगाव, कर्जत 38 अंशांपर्यंत पोहोचले होते.

मराठवाडा व मध्य- उत्तर महाराष्ट्रात तापमान कसे?

मराठवाड्यात लातूर (37.0°C), हिंगोली (36.9°C) आणि परभणी (36.6°C) येथे उष्णतेचा प्रभाव अधिक होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये 36 अंशांची नोंद झाली. पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यातील कराड येथे सर्वाधिक 39.7°C तापमान होते, तर पुणे आणि सांगलीमध्येही उन्हाचा तडाखा जाणवला. कोकण विभागात पालघर (38.9°C) आणि रत्नागिरीत (38.6°C)ची नोंद झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 4-5 दिवस तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नाही.महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात तापमानाचा पारा वाढलेला राहणार आहे. कोकणातील काही भागांमध्ये पुढील 3-4 दिवस कमाल तापमान 37 ते 38°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे. विदर्भातही पुढील 3 दिवस तापमानात मोठा बदल होणार नाही. (IMD forecast)

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/5bgZzQC Accident: भीषण! भरधाव वेगात दोन दुचाक्यांची जोरदार धडक, वसईत 3 जणांचा जागीच मृत्यू, पंचनामा सुरु

from laxmikant Shirke on Chhava Movie | छावाचे निर्माते, दिग्दर्शकांविरोधात कायदेशीर कारवाई करणार https://ift.tt/BaGv4b7
Maharashtra Weather: मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात आजपासून पावसाचा इशारा, होळीपूर्वीच उन्हाचा चटका वाढला, तापमानाचा अंदाज काय?
February 22, 2025
0