Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh: छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh) वापरलेली ऐतिहासिक वाघनखे नागपूरकरांना आजपासून (7 फेब्रुवारी) पाहता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत नागपुरात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून त्यामध्ये ऐतिहासिक वाघनखेही लोकांच्या अवलोकनासाठी ठेवली जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा ज्या वाघनखांच्या मदतीने बाहेर काढला होता, तीच वाघनखे काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने लंडनमधून खास महाराष्ट्रात आणली होती. सुमारे सात महिने छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ती वाघनखं साताऱ्यातील संग्रहालयात ठेवण्यात आली होती. मात्र, आता पुढील सात महिने ऐतिहासिक वाघनखं नागपूर शहरातील मध्यवर्ती संग्रहालयत ठेवण्यात येणार आहे. आज दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात शिवकालीन शस्त्रांच्या खास प्रदर्शनाचे उद्घाटन केले जाईल आणि त्यामध्ये इतर शिवकालीन शस्त्रांसह वागनखेही लोकांना पाहता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ही वाघनखं लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून भरतात आणण्यात आली आहेत.

दरम्यान पुरातत्व विभाग व राज्य सरकारने तयार केलेल्या वेळापत्रकानूसार शिवरायांची ऐतिहासिक वाघनखे सातऱ्यातील मुक्कामानंतर 1 फेब्रुवारी ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत नागपूर येथे व त्यानंतर 3 ऑक्टोबर ते 3 मे 2026 पर्यंत ती कोल्हापूर येथील संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच शिवरायांची ऐतिहासिक वाघनखे नागपूरकरांना आजपासून नागपूरकरांना पाहता येणार आहे.

तीन लाखांहून अधिक शिवप्रेमींनी या संग्रहालयाला दिली भेट-

लंडन येथील व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील संग्रहालयात 19 जुलै रोजी दाखल झाली होती. २० जुलैपासून ही वाघनखे तसेच संग्रहालयातील शिवशस्त्र शौर्यगाथा हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले करण्यात आले. प्रदर्शन सुरू झाल्यापासून राज्यभरातील तीन लाखांहून अधिक शिवप्रेमींनी या संग्रहालयाला भेट दिली. तसेच सामाजिक, कला, राजकीय क्षेत्रातील मंडळींनीही वाघनखांसह साताऱ्याचे तख्त, शिवकालीन शस्त्र, मुद्रा आर्दीचा इतिहास जाणून घेतला.

आणखी वाचा

<a href="https://ift.tt/Rfge4tK Jarange Patil : वाघनखं भारतात आणून राज्य सरकारने चांगलं काम केलं; मनोज जरांगे यांनी केलं सरकारचं कौतुक, म्हणाले...

from Special Report On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी इतर योजनांचा गळा घोटणार? https://ift.tt/XprFUfy
छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे नागपुरात; देवेंद्र फडणवीसांकडून आज शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन
February 06, 2025
0