ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 21 February 2025

आमदार सुरेश धस आज मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार,धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर झालेल्या टीकेनंतर धस पहिल्यांदा मस्साजोगला जाणार, महादेव मुंडेंच्या कुटुंबीयांनाही भेटणार.

संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा, मनोज जरांगेची मागणी, मस्साजोगला जाऊन गावकऱ्यांशी केली चर्चा...२५ फेब्रुवारीच्या अन्नत्याग आंदोलनावर गावकरी ठाम...

अमित शाह आज पुणे दौैऱ्यावर... नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढ्यासंदर्भात तिन्ही नेते शाहांसोबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती

दिल्लीत साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मोदी पवार एकत्र...मोदींनी पवारांसाठी खुर्ची केली पुढे, पाण्याचा ग्लासही दिला...पवारांकडून नेहरूंची तर मोदींकडून संघाची आठवण...

बंदुकीसाठीच्या परवान्यामुळे फुटलं कोकाटे गरीब नसल्याचं बिंग...कोकाटेंचा राजीनामा कधी घेणार, विरोधकांचा सवाल...तर बाबनकुळेंनी ठेवलं प्रक्रियेवर बोट...

पुणे महापालिकेच्या दीड हजार कर्मचाऱ्यांना आयकर विभागाकडून ४५ कोटींचा दंड, दंडवसुलीसाठी कर्मचाऱ्यांचे पगार दोन महिन्यांपासून बंद, टॅक्सची कामं लेखा आणि वित्त विभागाऐवजी बाहेरच्या सल्लागाराला दिली...

from मला मराठी येत नाही, कन्नडमधूनच बोलणार, बस अडवून कंडक्टरला मारहाण https://ift.tt/TA9neU6
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 21 February 2025
February 21, 2025
0