<p>Byculla Fake Currency : भायखळ्यात आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे थेट पालघरपर्यंत..</p> <p>भायखळा येथे आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे आता थेट पालघर पर्यंत पोहचले आहेत . पालघरच्या वाडा तालुक्यातील नेहालपाडा या गावात बनावट नोटा छापल्या जात असल्याच उघड झालं असून येथील एका पत्राच्या शेड मधून भायखळा पोलिसांनी पाचशे आणि 200 च्या नोटा , लॅपटॉप, प्रिंटिंग मशीन, लॅमिनेशन मशिन तसंच ए फॉर साईजचे १३६७ नग बटर पेपर जप्त करण्यात आले आहेत . यापूर्वी देखील पालघर मध्ये अशाच बनावट नोटांचे समोर आले असून स्थानिक पोलीस मात्र या सगळ्या घटनेपासून अनभिज्ञ असल्याचा आरोपात स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय . या प्रकरणातून वाड्यातील नेहालपाडा येथून नीरज वेखंडे , खलील अन्सारी यांना भायखळा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे .</p>
from Maharashtra Breaking News LIVE: नागपुरातील सात उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद, 'हे' आहे कारण https://ift.tt/xTHloPB
Byculla Fake Currency : भायखळ्यात आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे थेट पालघरपर्यंत..
January 13, 2025
0