Ads Area

Baba Siddique& Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं

मुंबई: मुंबईतील काँग्रेसचे एकेकाळचे बडे नेते आणि अलीकडच्या काळात अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी हत्या (Baba Siddique Murder Case) झाली होती. मुंबईच्या वांद्रे परिसरात कलानगर येथील कार्यालयाबाहेर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या गुंडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, या आरोपपत्रात आपण पोलिसांना दिलेल्या माहितीचा कोणताही उल्लेख नाही, त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी कोणताही तपास केला नाही, असा दावा बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. झिशान सिद्दीकी यांनी हे वक्तव्य करताना बाबा सिद्गिकी यांच्याकडील एका डायरीचा उल्लेख केला आहे. या डायरीत शेवटचे नाव भाजपचे नेते मोहित कंबोज यांचे असल्याचे सांगितले जाते. याप्रकरणात मोहित कंबोज यांचे नाव आल्याने आता भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.

झिशान सिद्दीकी यांच्या दाव्यानुसार, ते आणि त्यांचे वडील वांद्रे परिसरातील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या कामासाठी उभे राहायचे. हे काम करताना त्यांचा काही बड्या बिल्डर्ससोबत वाद झाला होता. बाबा सिद्दीकी यांना रोज डायरी लिहण्याची सवय होती. या डायरीत त्यांनी या सगळ्या बिल्डर्सची नावे लिहून ठेवली आहेत. मात्र, 12 ऑक्टोबरला जेव्हा बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली त्यादिवशी आपल्या वडिलांनी डायरीत एक शेवटचे नाव लिहले होते. हे नाव म्हणजे मोहित कंबोज. यानंतर माझ्या वडिलांनी मोहित कंबोज यांच्यासोबत व्हॉटसॲपवर चॅटिंगही केले  होते. संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास या दोघांमध्ये संवाद झाला होता. पण माझ्या वडिलांनी डायरीत मोहित कंबोज यांचे नाव का लिहले, हे मी सांगू शकत नाही. त्यामुळे या गोष्टीचा तपास होणे गरजेचे आहे, असा जबाब झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांनी झिशान यांच्या जबाबानुसार प्राथमिक तपास केला. मात्र, त्यामध्ये काहीही तथ्य आढळून न आल्याने पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी सर्वस्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्यांना जबाबदार धरल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

बाबा सिद्दीकींच्या डायरीत अदानींसह 7 बड्या बिल्डर्सचा उल्लेख, कोणाकोणाचा समावेश?

झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सातत्याने बाबा सिद्दीकी यांच्या डायरीचा उल्लेख केला आहे.  त्यानुसार वांद्रेतील पुर्नविकास प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यामुळे बाबा सिद्गीकी यांचा बड्या बिल्डर लॉबीशी वाद झाला होता. बाबा सिद्दीकी यांच्या डायरीत बिल्डर पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोएंका आणि ओंकार बिल्डर्स यांचा उल्लेख आहे. त्यामुळे आता या सगळ्या बिल्डर्सचा बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशी काही संबंध आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे.

झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी ज्ञानेश्वर नगर प्रकल्पबाधितांची बैठक घेतल्याचाही उल्लेख आहे. त्या बैठकीत विकासकांनी झोपडपट्टीधारकांना त्याच ठिकाणी घर मिळेल असे वचन दिले होते, पण त्यानंतर ते तसं कऱणार नसल्याचं लक्षात आल्याचे झिशान यांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आणखी वाचा

बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव

from ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 28 January 2025 https://ift.tt/jBv8mPq

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area