<p> Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 26 डिसेंबर 2024 : ABP Majha</p> <p>मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळांनी व्यक्त केलेली खदखद अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली. त्यानंतर चर्चा झाली ती भुजबळांना अजितदादांनी मुद्दामहून डावलल्याची. पण अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये याआधीपासून एक सुप्त संघर्ष असल्याचं बोललं जातं. तो संघर्ष होता उपमुख्यमंत्रीपदावरुनचा. त्या संघर्षामुळे भुजबळांना आता मंत्रीपद मिळालं नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. साल 1999... शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुका पार पडल्या. काँग्रेससोबत नव्यानं निर्माण झालेली राष्ट्रवादीही सत्तेच्या खुर्चीवर विराजमान झाली. महत्त्वाचं म्हणजे पक्षाचा जनाधार वाढावा यासाठी शरद पवारांनी छगन भुजबळांना थेट उपमुख्यमंत्रीपदावर बसवलं. भुजबळ राष्ट्रवादीचे पहिले उपमुख्यमंत्री बनले. तेलगी घोटाळ्यात भुजबळांचा राजीनामा भुजबळांची ही पहिली इनिंग सव्वा चार वर्षे चालली . पण तेलगी स्टँप घोटाळ्यात भुजबळांचं नाव आलं आणि 23 डिसेंबर 2003 ला भुजबळांना राजीनामा द्यावा लागला . त्यानंतर एक वर्ष विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यानंतर पुढची चार वर्ष आर आर पाटील राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री बनले.</p>
from Devendra Fadnavis on Manoj Jarange : आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही https://ift.tt/r8LOAle
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 26 डिसेंबर 2024 : ABP Majha
December 25, 2024
0