Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :2 डिसेंबर 2024 : ABP Majha

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून सोमवारी किंवा मंगळवारी त्यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती होईल अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री म्हणून ज्या नावाची घोषणा करतील त्याला पाठिंबा असेल असं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी आधीच जाहीर केलंय. दरम्यान, आझाद मैदानावर 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.

राज्यातील महायुती सरकार भक्कम पाठबळ मिळवत पुन्हा एकदा सत्तेत आलं आहे. त्यामध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्याने त्यांच्याकडेच मुख्यमंत्रिपद जाणार हे निश्चित होतं. पण देवेंद्र फडणवीस की आणखी कोण मुख्यमंत्री होणार यावर मात्र स्पष्टता नव्हती. पण आता देवेंद्र फडणवीसांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

from Rohit Patil On RR Patil : रोहित पाटलांनी वडिलांचं 'ते'वाक्य लक्षात ठेवलं https://ift.tt/5WvRlb1
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :2 डिसेंबर 2024 : ABP Majha
December 01, 2024
0