Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 11 डिसेंबर 2024 : ABP Majha

मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये काल रात्री नऊच्या सुमारास झालेल्या बेस्ट बसच्या अपघातानं (Mumbai Kurla Bus Accident) अवघा महाराष्ट्र हादरला. कुर्ला एलबीएस मार्गावरून भरधाव वेगानं जाणाऱ्या बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटून एक भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा जीव गेला. तर 49 जण गंभीर जखमी झाले. त्याशिवाय बसच्या धडकेनं रस्त्यावरच्या 20-22 वाहनांचंही मोठं नुकसान झालं.

कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं आहे. हा अपघात नेमका का घडला? त्यात दोषी कोण? या प्रश्नांच्या उत्तराचा शोध सुरु झाला आहे. या अपघातामुळं बेस्ट प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तर बस चालक संजय मोरे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती

from Maharashtra Breaking News Live Updates: एसटी महामंडळाची आज महत्वाची बैठक https://ift.tt/QxEApsj
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 11 डिसेंबर 2024 : ABP Majha
December 10, 2024
0